कोरपना तालुक्यातील शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत….

0
751

कोरपना तालुक्यातील शेतकरी प्रोत्साहनपर अनुदानाच्या प्रतीक्षेत….

काँग्रेस पार्टीचे युवा नेते इरफान शेख यांची मागणी

 

कोरपना : तालुक्यातील शेतकऱ्यांनी पीककर्ज घेतले आहे. पण अस्मानी व सुलतानी संकटामुळे पिकांचे नुकसान झाल्याने काही शेतकऱ्यांनी पिककर्जाचा भरणा केलेला नाही. त्यांना पीककर्ज माफीचा लाभ मिळाला आहे. पण नियमित पीककर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ मिळालेला नाही. दरम्यान सरकारने त्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा केली आहे. परंतु आजूनपावतो शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा झालेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे. राज्य शासनाने सेवा सहकारी संस्थेच्या माध्यमातून तीन लाखाचे पीककर्ज बिनव्याजी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, कोरपना तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामाच्या तोंडावर पीककर्ज घेतलेले आहे. आणि याच पिककर्जातुन त्यांनी बियाणे, खत व शेतीउपयोगी साहित्य खरेदी केले आहे. पण मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांवर अस्मानी व सुलतानी संकट ओढवल्याने त्यांनी पिककर्जाचा भरणा केलेला नाही. या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकऱ्यांना पीककर्ज माफीचा लाभ देण्यात आला आहे. पण नियमित पिककर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना कोणताही लाभ दिलेला नाही. दरम्यान नियमित पीककर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजाराचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून शेतकरी या अनुदानाच्या प्रतीक्षेत आहे. नियमित पिककर्जाचा भरणा करून ‘पाप’ केले काय, असा सवाल शेतकरी करीत आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक अडचण असतांना सुध्दा त्यांनी पिककर्ज नियमित भरले आहे. पशुधन व दागदागिने विकून सरकारला सहकार्य केले आहे. सध्या शेतकरी अतिवृष्टी व पुराच्या पाण्यामुळे हवालदिल झाला आहे. उभे पिके जमीनदोस्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. अशा संकटाच्या काळात सरकारने नियमित पीककर्ज भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अनुदान जमा करावे याकरीता शेतकऱ्यांचे शासनाकडे लक्ष लागले आहे.

तसेच कोरपना तालुक्यामध्ये सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले असून तर शेतकरी करायची तरी काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. कापूस सह सोयाबीन पीक हातातून गेले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. यामुळे संबंधित विभागाने तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना आधार द्यावे अशी मागणी तालुका युवा नेता ईरफान शेख यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here