वणी’ कोरपना राष्ट्रीय महामार्गाशी जोडा – आबिद अली यांची मागणी
कोरपना प्रतिनिधी
आपल्या प्रयत्नातून नक्षलग्रस्त दुर्गम आदिवासी भागातील कोरपणा राजुरा तालुक्याला राष्ट्रीय महामार्गाची जोडल्या गेल्याने तेलंगाना छत्तीसगढ व महाराष्ट्र राज्यातील चंद्रपूर जिल्ह्याचे महत्व वाढले. कोरपणा राजुरा हे तालुके सिमेंट, कोळसा व खनिज मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने येथे औद्योगिक प्रगती झाली. ही मागासलेली तालुके हायवे शी जोडल्या गेल्यामुळे या क्षेत्राला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र करंजी, वणी, वरोरा हायवे व आदिलाबाद, राजुरा हायवे यांच्या मध्यभागामध्ये यवतमाळ जिल्ह्यातील वणी’ कोरपणा हा रस्ता अत्यंत दुर्लक्षित व वाहतुकीसाठी गैरसोयीचे आहेत. तेलंगणावरून किंवा जिवती, कोरपणा तालुक्यातील नागरिकांना औरंगाबाद किंवा नागपूर जाण्यासाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे अंतर, वेळ व पैशाची बचत होणार आहे. नागरिकांच्या हितासाठी वणी’ कोरपणा हा 36 किलोमीटरचा मार्ग याकरिता केंद्रीय रस्ते विकास निधी किंवा राष्ट्रीय महामार्ग मध्ये समावेश करून हा रस्ता अनेक वर्षापासून दुर्लक्षित असल्याने याकडे आपण आवश्यक प्रयत्न करावा, अशी विनंती निवेदनाद्वारे तसेच कोरपणा स्थित ओव्हरफ्लाय उड्डाणपूल प्रस्तावित ठिकाणीच ओपन पद्धतीचे कालम वर घेतल्यास शहराच्या विकासामध्ये भर पडून व्यापाऱ्यांना देखील लाभ होईल याबाबत निवेदनाद्वारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष आबिद अली यांनी निवेदनाद्वारे केली. यावेळी मंत्री महोदयांनी अनुभूतीने विचार करण्यात येईल असे आश्वासित केले.