लाॅयड्स मेटल्स उद्योग परिसरात दुर्मिळ पक्षाचे दर्शन
पंकज रामटेके /विशेष प्रतिनिधी
घुग्घुस : स्पंज ऑयन उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या घुग्घुस येथील लाॅयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमी. उद्योग परिसरात गुरुवारी एका दुर्मिळ पक्षाचे दर्शन झाले. मनमोहक असा दुर्मिळ पक्षी पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. दरम्यान लाॅयड्स मेटल्स परिसरातील वातावरण पशु-पक्ष्यांसाठी पोषक असल्यामुळेच दुर्मिळ पक्षी या परिसरात मुक्तविहार करीत असल्याचे दिसून येत आहे.
घुग्घूस येथील लाॅयड्स मेटल्स ॲन्ड एनर्जी लिमी. या उद्योगात स्पंज ऑयनचे उत्पादन घेतले जाते. परंतु या उत्पादनाचा वातावरणावर कोणताही परिणाम होवू नये, यासाठी व्यवस्थापनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. वृक्षारोपण, पाणी शुद्धीकरण करुन सोडण्यासह इतरही उपाययोजना केल्या जातात. त्यामुळेच पशु-पक्षी येथील नैसर्गिक वातावरणात संचार करीत आहे. उद्योग परिसरात पाण्याचा मोठा तलाव असून या तलावात मासे सोडण्यात आले आहे. सर्व मासे जीवंत असून येथील वातावरण प्रदूषित नसल्याचे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे. दरम्यान, गुरुवारी उद्योग परिसरात आढळलेला दुर्मिळ पक्षी ऑस्ट्रेलियातील असल्याचे पक्षी अभ्यासकांनी सांगितले असून येथील अधिकाऱ्यांनी सदर पक्षाला कॅमेऱ्यात कैद केले आहे.