निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

0
850

निशुल्क मोतीबिंदू नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन

स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे निमित्त, नांदा फाटा मित्रपरिवाराचा पुढाकार

 

 

नांदा फाटा :- येत्या १५ आगस्ट ला स्वातंत्रदिनी देशभरात ७५ वा आझादीचा स्वतंत्र महोत्सव उत्सवात साजरा होणार आहे त्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन सुद्धा करण्यात आले आहे.

याच पाश्र्वभूमीवर स्वामी विवेकानंद युवा मित्र मंडळ व युवा मित्र परिवार, नांदा फाटा,आचार्य विनोबा भावे सावंगी (मेघे) वर्धा,जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर व प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा फाटा यांच्या सहकार्याने समता फाउंडेशन द्वारा निशुल्क मोतीबिंदू लेन्स, नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन १६ /०८/२०२२ रोज मंगळवार ला प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा फाटा येथे करण्यात आले आहे.

शिबिरामध्ये सहभागी झालेल्या रुग्णांची मोफत तपासणी आणि योग्य सल्ला व मार्गदर्शन केले जाईल. मोतीबिंदू असलेल्या रुग्णांची आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी (मेघे)/ जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे मोफत शस्त्रक्रिया केली जाईल,मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा ने आण चा प्रवास राहण्याची जेवणाची मोफत सोय करण्यात येईल,शिबिरात मोतीबिंदू आढलेल्या रुग्णांना ऑपरेशनची तारीख शिबिराच्या दिवशी दिली जाईल अशी माहिती एका प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे दिली असून परिसरातील जास्तीत जास्त रुग्ण किव्हा गरजुनी शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन पुरुषोत्तम निब्रड, नांदा, नांदा फाटा युवा मित्रपरिवार तसेच आरोग्य अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे व प्रा.आरोग्य केंद्र नांदा वैद्यकीय अधिकारी डॉ.राहुल लांडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here