माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी जिवती तालुक्यातील आदिवासी बहिणींकडून दरवर्षी प्रमाणे केले रक्षाबंधन…
सुदर्शन निमकर हे आमदार असतांना एका कार्यक्रमाच्या निमीत्ताने जिवती या दुर्गम तालुक्यातील ग्रा.पं.खडकी व हीरापुर या दोन गावात गेले असतांना व योगायोगने त्याच दिवशी रक्षाबंधनाचा सन असल्यामूळे त्या दोन गावातील अंजनाबाई जंगू सोयाम व गोदाबाई भीमराव मडावी या दोन महिलांनी रितिरिवाजा प्रमाणे निमकर यांना राख्या बांधून आपले कर्तव्य बजावले. तेव्हापासून निमकर यांनी सुद्धा अगदी अविरतपणे अठरा वर्षा पासुन न चुकता रक्षाबंधनाला जाऊन साळि चोळि ची भेट देऊन, बाहीण भवाच्या पवित्र नात्याची जोपासना करीत आहे. यादिवशी यानिमित्ताने दोन्ही गावात रक्षाबंधनाचा उत्सव साजरा केल्या जाते. यावर्षी सुद्धा 11 ऑगस्ट 2022 ला निमकर यांनी दोन्ही गावाला जाऊन राख्या बांधून घेतल्या. या कौटुंबिक सोहळ्या याप्रसंगी वि.मा.शि.चे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिवती पं.स.चे केंद्र प्रमुख सुधाकर चंदनखेडे, भोक्सापुर ग्रा.पं.चे उपसरपंच गोविंद मीटपल्ले, भाजपा चे पदाधिकारी विट्ठल चव्हाण, पाटण चे जयदेव आत्राम महाराज, खडकी चे माजी सरपंच भीमराव पा. मडावी, जंगू पा. सोयाम, तिरुपती पोले, इमाम भाई सह मान्यवर व ग्रामस्थ उपस्थीत होते.