कर्जबाजारीला कंटाळून आवाळपुर येथील वृद्धेची आत्महत्या

0
820

कर्जबाजारीला कंटाळून आवाळपुर येथील वृद्धेची आत्महत्या

 

नांदाफाटा : सतत नापिकीमुळे वाढलेले कर्ज फेडणे अशक्य असल्याचे दिसून येत असल्याने कोरपना तालुक्यातील आवाळपुर येथील वृद्ध विधवा शेतकरी महिला श्रीमती पारबताबाई शालीक देवगडे (65) यांनी वाढते कर्ज आणि मुलाचे आजारपण व त्यामुळे वाढलेलं कर्ज यामुळे विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना काल दिनांक 9 ऑगस्ट ला घडली. गडचांदूर पोलिसांनी घटनेची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.

 

त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्या आपल्या मुलासोबत राहत होत्या. यातच त्यांचा मुलाला कोरोनाने ग्रासले त्यानंतर काहीच दिवसात भयानक अशा बुरशीचा आजारपणाने ग्रासले. मोठा खर्च उपचारासाठी आला. त्यात कुटुंबाचे उदरभरण करताना ओढाताण होत असल्याने त्यांनी कर्ज घेतले. ते फेडणे शक्य न झाल्याने मागील काही दिवसांपासून त्या मोठ्या विवंचनेत होत्या. याच विवंचनेतुन त्यांनी विष प्राशन केले. लगेच त्यांना उपचारासाठी नजदीकचा गडचांदूर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक इलाज करून त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यासाठी कळविण्यात आले.मात्र पूरपरिस्थिती असल्याने त्यांना त्यांना चंद्रपूर येथे हलविता आले नाही. त्यामुळे त्यांना गडचांदूर येथेच इलाज करावा लागला. अशातच रात्री 9:00 चा सुमारास त्यांचे निधन झाले. त्यांचा पश्चात्य आजाराशी झुंज देत असलेला एक मुलगा, दोन मुली, सून, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here