घुग्घुस येथे मोहरम निमित्त भोजनदान

0
836

घुग्घुस येथे मोहरम निमित्त भोजनदान

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी

 

मंगळवारी, ९ ऑगस्ट रोजी दुपारी घुग्घुस-वणी मार्गावरील शुभम पेट्रोल पंप जवळ नकोड्याचे माजी उपसरपंच हनीफ मोहम्मद यांच्या नेतृत्वात मोहरम निमित्त भोजनदान करण्यात आले.

याप्रसंगी ये-जा करणाऱ्या नागरिकांना मसाला भाताचे वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येत नागरिकांनी मसाला भात वाटपाचा लाभ घेतला.

अन्नदाते म्हणून विवेक बोढे, हेमराज बोंबले, रवीश सिंग, महफुज खान, नौशाद सय्यद उर्फ लालमिया, राहुल यदुवंशी, मोसीम शेख, वसीम अंसारी, विलास निखाडे (शिंदोला), संतोष सिंग एसीसी कॉन्ट्रॅक्टर, मोबीन खान, श्रीनिवास लक्काकुला, विनोद रामटेके, उदय सिंग पट्टा, फुलचंद यादव यादव यांनी सहकार्य केले.

यावेळी इफ्तेखार अहमद (सदर साहेब) घुग्घुस, सोहेल राजा शेख अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष काँग्रेस, मुस्तफा उर्फ लाला, शहनवाज खान, अनिस भाई, वसीम अंसारी, उस्मान भाई, साकिब खान, मोहम्मद हुसैन खान, व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here