पळसगाव येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याकरिता एनडीआरएफचे बोट तैनात…
देवराव भोंगळे यांचा पुढाकार
भद्रावती : लोअर वर्धा धरणातून सोडण्यात येत असलेल्या पाण्यामुळे भद्रावती व वरोरा तालुक्यांतील काही गावांमध्ये पून्हा पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे कॅबिनेट मंत्री ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या सुचनेनुसार जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे भद्रावती तालुक्यातील पळसगाव येथे भेट देऊन संपूर्ण परिस्थितीची पाहणी केली.
पळसगावला चारही बाजूने पुराचा वेढा असल्याने जिल्हा प्रशासनातर्फे काही नागरिकांना बोटीने रेस्क्यू करण्यात आले. परंतू पाण्याची वाढ कमी असल्याने गावकर्यांनी गावातच सुरक्षिततता जोपासून सतर्कता बाळगली आहे. याठिकाणी प्रत्यक्ष बोटीने जाऊन गावकर्यांना भेटून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
वेकोलिच्या मातीच्या ढिगाऱ्यांमुळे (OB) याठिकाणी वारंवार पुराचा धोका निर्माण होतो त्यासंदर्भात लवकरच सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले. पंधरवड्याआधी येऊन गेलेल्या पुरामुळे जवळपास तीन दिवस पळसगाव पाण्यात होते घरांची व शेत्यांची मोठी नुकसान झाली. परंतू अद्यापही स्थानिकांना मदतीचे धनादेश शासनाने दिले नाही अशी तक्रार गावकर्यांनी केली. प्रसंगीच जिल्हाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी करून यासंदर्भात तातडीने मदत पोहचविण्यात यावी अशी मागणी केली. यासोबतच पुरपरिस्थितीमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न तसाच आहे त्यामुळे तत्परतेने परीसरातील गावांना चारा उपलब्ध करून द्यावा. असेही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
याप्रसंगी माजी जि. प. सदस्य प्रविण सुर, वरोरा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजयुमोचे अमित चवले, राजेश रेवते, रवी भोगे, तलाठी राजुरकर यांचेसह आदि मंडळी सोबत उपस्थित होते.