लोकनेते, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल घुग्घुस भाजपतर्फे शहरात आनंदोत्सव

0
636

लोकनेते, मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल घुग्घुस भाजपतर्फे शहरात आनंदोत्सव

चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येकासाठी आजचा दिवस अभिमानाचा – जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे

पंकज रामटेके/विशेष प्रतिनिधी

मंगळवार, दि. ९ ऑगस्ट
लोकनेते, विकासपुरुष मा. ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज सकाळी राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यावर घुग्घुस येथील गांधी चौकात भारतीय जनता पार्टीच्या वतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
या आनंदोत्सव भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी शामील होऊन जल्लोष केला.

या आनंदोत्सवादरम्यान ढोलताशांच्या गजरात फटाक्यांची अतिषबाजी करून गुलाल उधळत मिठाईचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी बोलतांना भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले, आमचे नेते, विकासपुरुष ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. आजचा हा दिवस आम्हा चंद्रपूर जिल्हा वासीयांसाठी अत्यंत आनंदाचा व अभिमानाचा असा आहे. मागील फडणवीस सरकारामध्ये अर्थमंत्री व जिल्ह्याचे यशस्वी पालकमंत्री म्हणून आदरणीय भाऊंनी पाच वर्षे अविरतपणे जिल्ह्याच्या विकासासाठी व्हिजन आखले, अनेक मोठमोठी विकासकामे जिल्ह्यात खेचून आणली. त्यामुळे चंद्रपूरचे नाव महाराष्ट्रातचं नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले. राजकारणाला समाजकारणाचा राजमार्ग मानणाऱ्या सुधीरभाऊंसारख्या दूरदर्शी व्यक्तिमत्त्वाला पुन्हा एकदा राज्यमंत्रिमंडळातून जनतेच्या सेवेची संधी मिळाल्याने आज संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे.

पुढे बोलताना, मागील अडीच वर्षे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते. त्यामध्ये जनतेचे मरण हेचं सरकारचे धोरण अशी परिस्थिती होती.

परंतू आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वातील युती सरकार हे शेतकर्‍यांचे, सर्वसामान्यांचे सरकार आहे. यासोबतच चंद्रपूर जिल्ह्याचे सुपुत्र ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी राज्य मंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री पदाची शपथग्रहण केल्याने आता पुन्हा एकदा राज्यात व चंद्रपूर जिल्ह्यात विकासाची नवी शृंखला चालू होईल. आणि निश्चितचं चंद्रपूर जिल्हा सुजलाम सुफलाम होण्यास मदत होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आजच्या या सुवर्णदिनी लोकनेते ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेसह चंद्रपूरांतर्फे पुढिल यशस्वी वाटचालीसाठी देतो. असेही ते म्हणाले.

ढोलताशांच्या गजरात गांधी चौकातून निघालेल्या मिरवणूकीची सांगता स्थानिक आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात करण्यात आली.

यावेळी, माजी जि. प. सभापती सौ. नितुताई चौधरी, भाजपाचे निरीक्षण तांड्रा, संजय तिवारी, विनोद चौधरी, रत्नेश सिंग, राजेश मोरपाका, संजय भोंगळे, साजन गोहने, वैशाली ढवस, अमोल थेरे, हसन शेख, मानस सिंग, सचिन कोंडावार, बबलू सातपुते, प्रवीण सोदारी, हेमंत पाझारे, तुलसीदास ढवस, रवी चुने, सुरेंद्र जोगी, नितीन काळे, सुनील राम, गुड्डू तिवारी, हेमंत कुमार, वमशी महाकाली, राजू डाकूर, खलील अहमद, मुमताज कुरेशी, राजू कुरेशी, मुस्तफा शेख, वसंता भोंगळे, मंदेश्वर पेंदोर, मंत्रीबाबू, मधुकर धांडे, संकेत बोढे, नईम खान, अब्दुल सलीम यांचेसह मोठ्या संख्येने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते आनंदोत्सवास उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here