“स्वराज्य महोत्सव” निमित्त प्रियदर्शनी विद्यालयाच्या वतीने रॅली
देशभक्ती घोषणांनी दणाणले रामपूर
राजुरा : भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव उपक्रम शाळा स्तरावर राबवून जनतेच्या मनात या स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती तेवत रहाव्यात व देशभक्तीची भावना कायम स्वरूपी तेवत राहावी आणि आपल्या इतिहासातील हुतात्म्यांचे स्मरण व्हावे, यासाठी “स्वराज्य महोत्सव” निमित्त रामपूर येथील प्रियदर्शनी विद्यालयाच्या वतीने आज (दि. ६ जुलै) सकाळी स्वराज्य महोत्सव रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीत विद्यालयातील विद्यार्थ्यांनी बँड वाजवत, हातात ध्वज, थोर पुरुषांचे छायाचित्र व देशभक्तीपर घोषणा देत रामपूर वस्तीतून रॅली काढली.
भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याचे निमित्ताने रामपूर येथे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत स्वराज्य महोत्सव जनजागृती रॅली आयोजित करण्यात आला. या रॅलीत रामपूरच्या सरपंच वंदनाताई गौरकार, सदस्य विलास कोदिरपाल, मुख्याध्यापक मनोज पावडे, शिक्षक कर्मचारी नितीन ठाकरे, महेंद्र मंदे, राजेश वाघाये, ममता नंदूरकर, श्रीकृष्ण गोरे, इंद्रराज वाघमारे, रमाकांत निमकर, प्रफुल ठाकरे सहभागी होते.