वरोऱ्यात महागाई विरोधात काँग्रेस रस्त्यावर
चंद्रपूर : केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर देशात काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. जिल्ह्यामध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. वरोऱ्यात पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. वरोऱ्यात पोलिसांनी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांना ताब्यात घेतलं.
यावेळी तालुका काँग्रेस अध्यक्ष मिलिंद भोयर, शहर काँग्रेस अध्यक्ष विलास टिपले, विशाल बदखल, माजी बाजार समिती सभापती राजेंद्र चिकटे, छोटूभाई शेख, प्रदीप बुराण, सन्नी गुप्ता, मनोहर स्वामी, सलीम पटेल, राहुल देवडे, प्रमोद काळे, विजय पुरी, सुभाष दांदले, राहील पटेल, प्रफुल असूटकर, अनिल झोटिंग, गणेश काळे, पुरुषोत्तम पावडे, राजेंद्र बन्सोड, प्रदीप घागी, तन्वीर शेख, प्रफुल आसुटर, राहुल देवळे, मयूर वीरूटकर, निखिल राऊत, सुरज बावणे, अनिरुद्ध देठे, राजेश महाजन,सूरज गावंडे, प्रमोद नागोसे, शेख रिजवान शेख रसूल, वसंता उमरे, शेख मोहिद्दीन, रवींद्र धोपटे, अरुण बरडे, सुरेश मेश्राम, पुरुषोत्तम पावडे, यशोदा खामणकर, शिरोमणी स्वामी, दीपाली मोरे, सरिता सूर, प्रतिभा सोनटक्के, रत्नमाला अहिरकर, मीना राहटे, माया साळवे, शीतल गेडाम, लता इंदूरकर, मंगला पिपळकर, अभिमान काळे यांची उपस्थिती होती.