हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत निघालेल्या सायकल रॅलीचे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत
रॅलीत सहभागी झालेल्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त राबविण्यात येत असलेल्या हर घर तिरंगा या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज चंद्रपूरात निघालेल्या सायकल रॅलीचे गांधी चौक येथे यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी रॅलीत सहभागी चंद्रपूरकरांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती.
स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा या उप्रकमाबाबत जनजागृती करण्यासाठी क्रिडा अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद शिक्षण विभाग आणि नेहरु युवा केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आज शुक्रवारी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा क्रिडा संकुल बॅटमिंटन हाॅलच्या गेटपासुन सदर सायकल रॅलीला सुरवात झाली. रॅली अभियानाबात जनजागृती करत शहराच्या मुख्य मार्गाने मार्गस्त झाली. ही रॅली गांधी चौक येथे पोहचताच यंग चांदा ब्रिगेडच्या पदाधिका-र्यांनी रॅलीचे स्वागत केले. यावेळी रॅलीत सहभागी विद्यार्थी, शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी,, क्रिडा मंडळ पदाधिकारी व चंद्रपूरातील नागरिकांसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी यंग चांदा ब्रिगेडचे महानगर जिल्हाध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, बंगली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, विनोद अनंतवार, राहुल मोहुर्ले, चंद्रशेखर देशमुख, प्रतिक हजारे, विमल कातकर, आशा देशमुख आदिंची उपस्थिती होती.