अन् रचला स्वत:च्या अपहरणाचा बनाव…
पालक रागावण्याच्या भीतीपोटी दहा वर्षीय मुलाने स्वतःच्या अपहरणाचे नाटक रचले. या घटनेने पालकासह पोलिसही चक्रावून गेले. परंतु अखेरीस पोलिसांनी त्या मुलाला विश्वासात घेऊन सत्य उघडकीस आणले. टीव्हीवरील क्राइम मालिकांचा व मोबाईलचा लहान मुलांवर किती खोलवर परिणाम पडतो. हे या घटनांतून दिसून येते. अपहरणाचा बनाव असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांनीही सुटकेचा नि:श्वास्त सोडला.
याबाबत हकीकत अशी की, चंद्रपूर शहराजवळील पडोली येथील एक मुलगा नेहमीप्रमाणे शाळेत जाण्यासाठी घरातून बाहेर पडला. मात्र तो शाळेत गेलाच नाही. शाळेला चक्क दांडी मारली. परंतु घरी परत गेल्यावर पालकांने विचारले तर काय? सांगायचे. पालक रागावतील या भीतीपोटी मुलाने शक्कल लढवली. त्या मुलाने स्वतःचा अपहरणचा बनाव केला. शाळा सुटल्यानंतर मुलगा उशिरा पोहोचल्याने पालकांनी विचारपूस केली असता. मुलाने आपले एका मालवाहू ट्रकचालकाने अपहरण केले होते. आपण त्याच्या तावडीतून कसाबसा सुटलो, म्हणून यायला उशिर झाल्याचे सांगितले. मुलांने सांगितलेल्या माहितीवरून पालकांनी तत्काळ पोलीस स्टेशनला धाव घेतली. येथे अशीच कहाणी मुलाने सांगितली.
त्यानुसार पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेत मुलाने सांगितलेल्या मेटाडोरचा नंबर व चालकाची महामार्ग तपासणी केली असता बनाव समोर आला.