पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या प्रयत्नांना मोठे यश
बीपी, शुगर व रंग अंधत्व असलेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा प्रश्न अखेर मार्गी
प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद, उमेदवारांनी मानले अहीरांचे आभार
चंद्रपूर / यवतमाळ :– वेकोलि मुख्यालयाअंतर्गत चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील बीपी, शुगर व रंग अंधत्व असलेल्या वेकोलि प्रकल्पग्रस्तांचा नोकरीविषयक प्रलंबित प्रश्न पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या मागील दोन वर्षांपासुनच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे मार्गी लागल्याने संबंधीत प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंद व्यक्त होत असुन त्यांनी अहीर यांचे आभार मानले आहे.
दोन्ही जिल्हयातील बीपी, शुगर व रंग अंधत्व असलेल्या शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या नोकऱ्याचा प्रश्न शारीरिक अपात्रतेमुळे धोक्यात आला होता या संबंधातील वाढत्या तक्रारींची तसेच प्रकल्पग्रस्तांवर होणाऱ्या अन्यायाची गांभीर्याने दखल घेवुन हंसराज अहीर यांनी हा प्रश्न कोल इंडीया कडे लावुन धरला संबंधीत प्रकल्पग्रस्तांवर विनाकारण अन्याय होत असल्याची बाब त्यांनी निदर्शनास आणून दिली होती. त्याच्या भुमिकेला ग्राह्य धरुन कोल इंडीयाने याबाबत सकारात्मक निर्णय घेतला होता. परंतु वेकोलिच्या सगळ्याच कंपन्यामध्ये चुकीचा अन्वयार्थ लावुन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीपी, शुगर व रंग अंधत्व असलेल्या प्रकल्पग्रस्तांना अनफिट करुन नोकरीचा मार्ग रोखुन धरला होता.
सदर प्रकरणाची गांभीर्याने दखल घेवुन हंसराज अहीर यांनी हा प्रश्न गत दोन वर्षांपासुन वेकोलि नागपूर मुख्यालय व अध्यक्ष कोल इंडिया यांच्या स्तरावर सतत पाठपुरावा करीत हा प्रश्न अखेर मार्गी लावण्यात यश मिळविले आहे. दि. 25 जुलै 2022 रोजी सिएफडी च्या बैठकीमध्ये बीपी व शुगर असणाऱ्या मात्र यांमुळे शरीरातील कोणत्याही अवयवास अपाय झाला नसलेल्या उमेदवारांस नोकरीसाठी पात्र समजले जाईल तसेच रंग अंधत्व असणाऱ्या उमेदवारांना बी ग्रुप अंतर्गत नोकरी बहाल करण्याचा सकारात्मक निर्णय घेत या प्रलंबित प्रश्नावर मोहर उमटवल्याने सदर प्रकल्पग्रस्तांचा नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्याय मिळाल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये आनंदाचे वातावरण असुन त्यांनी वेकोलि प्रकल्पग्रस्तांच्या न्यायासाठी झटणाऱ्या हंसराज अहीर यांचे विशेष आभार मानले आहे.