आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत न.प. कार्यालयातर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरवात
कोरपना प्रतिनिधी : नगर परिषद गडचांदूर तर्फे भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, जनतेच्या मनात या स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात राहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण करण्यासाठी “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत न.प गडचांदूर कार्यालया तर्फे स्वराज्य महोत्सवाची सुरवात करण्यात आली. या अंतर्गत विशेष सभेचे आयोजन करून “हर घर झेंडा“ अभियान संपूर्ण नगर परिषद क्षेत्रात राबविण्याचे नियोजन करण्यात आले तसेच न.प. गडचांदूर कार्यालय राष्ट्रध्वज विक्री केंद्राचे उद्घाटन मा.सौ. सविता सुरेश टेकाम, अध्यक्षा न.प गडचांदूर यांचे हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी क्रांतीसिंह नाना पाटील यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. प्रसंगी विशेष कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर कर्यक्रमाला मा. सर्व नगर सेवक व कर्मचारी वृंद उपस्थित होते.