आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात घुग्घुस सर्कल ऑटो चालक-मालक संघटनेची बैठक संपन्न
देशाच्या प्रगतीत ऑटो चालकांचे अमूल्य योगदान – विवेक बोढे
घुग्घुस येथील आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या मार्गदर्शनात घुग्घुस सर्कल ऑटो चालक-मालक संघटनेची बैठक मंगळवारी, २ ऑगस्ट रोजी संपन्न झाली.
याप्रसंगी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विविध समस्यांवर चर्चा केली. तसेच आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या कुलजारचे वाटप भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांच्या हस्ते करण्यात आले.
मनोगत व्यक्त करतांना भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे म्हणाले, देशाच्या प्रगतीत ऑटो चालकांचे अमूल्य योगदान आहे. ऑटो चालक-मालकांच्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली असून मागील २० वर्षापासून ही संघटना भाजपाशी जुळलेली आहे व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार व भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या माध्यमातून समस्या सोडविण्यात येत आहे.
यावेळी घुग्घुस सर्कल ऑटो चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष सिनू सुद्दाला, रवी मुक्के, संजय गेडाम, संतोष मुक्के, संजय गेडाम, संतोष कोंडपेल्लीवार, संतोष ठमके, विठ्ठल हिकरे, विजय इंगोले, राजू उमरे, ज्योतीसिंग चव्हाण, विलास धोटे, रामू बहुराशी, महेंद्र कोयाडा, जितू कोंडावार, बाबा बंड, शेख मुस्तफा, असिफ खान, रमेश पोल तथा अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.