पुरग्रस्त 1 हजार पाचशे 50 नागरिकांना धनादेश मंजूर
तात्काळ पंचनामा करुन आर्थिक मदत करण्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले होते निर्देश
आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिका-र्यांसह पुरग्रस्त भागाची पाहणी केली होती. यावेळी नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन पीडितांना आर्थिक मदत करण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी प्रशासनाला दिले होते. त्यांनतर प्रशासनाने तत्परता दाखवत सर्व पंचनामे करुन 1 एजार पाचशे 50 पुरपिडीतांचा धनादेश मंजूर केला असून सदर धनादेश वितरीत करण्याचे काम प्रशासनाच्या वतीने सुरु करण्यात आले आहे.
दोन आठवड्या पूर्वी चंद्रपूरात पूरपरिस्थीती होती. दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी तहसिलदार निलेश गौंड यांच्यासह संबंधित अधिका-र्यांना घेऊन पुरपरिस्थिची पाहणी केली होती. यावेळी अनेकांची घरे पाण्यात बुडाल्याने त्यांची अस्थायी निवा-र्यांमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. यात शहरातील रहमत नगर, भिवापूरातील भंगाराम आणि सहारा पार्क भाग अधिक प्रभावित झाला होता. या भागाचीही आमदार किशोर जोरगेवार यांनी पाहणी केली होती. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सुचनेनंतर येथील नागरिकांच्या भोजनाची व्यवस्था यंग चांदा ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली होती. सदर पाहणी दौ-र्या दरम्याण आमदार किशोर जोरगेवार यांनी नुकसाणीचे पंचनामे करुन तात्काळ शासकीय मदत देण्याचे निर्देश प्रशासनाला दिले होते. त्यांनतर नायब तहसीलदार यांनी नुकसानीचे पंचनामे केले.
पंचनामांच्या आधारावर 1 हजार पाचशे 50 नागरिकांना धनादेश मंजूर करण्यात आले. दरम्याण आज सहारा पार्क आणि राज नगर येथील नागरिकांना प्रशासनाच्या वतीने सदर धनादेशचे वाटप करण्यात आले. यावेळी तलाठी वर्भे, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडच्या महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, बंगाली समाज महिला शहर प्रमुख सविता दंडारे, अल्पसंख्याक विभागाचे युथ शहर प्रमुख राशेद हुसेन, युवती प्रमुख भाग्यश्री हांडे, सायली येरणे आदिंची उपस्थिती होती.