विरूर पोलिसांनी देवदूत बनून जखमी तरुणाचे वाचवले प्राण

0
992

विरूर पोलिसांनी देवदूत बनून जखमी तरुणाचे वाचवले प्राण

● सोशल मीडियाद्वारे मदत

 

विरूर स्टेशन/अविनाश रामटेके
जनतेच्या सुरक्षेसोबतच पोलीसही माणुसकीचा धर्म पाळून लोकांची मने जिंकत आहेत. महाराष्ट्र पोलीसांचा असा प्रकार विरूर पोलीस ठाण्याअंतर्गत समोर आला आहे. पोलिसांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. चालत्या ट्रेनमधून पडल्याने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जखमी तरुणाला मदतीसाठी आपल्या खाकीने मानवतेचे कर्तव्य पार पाडले. जीव वाचवून त्यांनी आपल्या माणुसकीचा दाखला दिला आहे.

काल रात्री बिहारी रहिवासी शैलेश कुमार राय जिल्हा कैमूर (वय 35) हा चालत्या ट्रेनमधून विरूर स्टेशनच्या रेल्वे प्लॅटफॉर्मखाली पडला. त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तो रक्ताच्या थारोळ्यात रेल्वे ट्रॅकच्या बाजूला पडला होता.

सकाळी मॉर्निंग वॉक करत असताना विरूर रहिवासी बन्नी पाला यांची नजर रेल्वे ट्रकच्या बाजूला पडलेल्या जखमी तरुणावर पडली. त्यांनी तत्काळ परिस्थितीचा आढावा घेऊन रेल्वे विभागाच्या कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मात्र रेल्वे कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती पाहून पाल यांनी अपघात झालेला युवकाला मदत मिळण्याच्या हेतूने विरूर सिटी अपडेट व्हॉट्सअॅप ग्रुपवर त्याचे फोटो टाकून व्हायरल केले. आणि मदतीची याचना केली.

त्यामुळे विरूर पोलिसात कार्यरत हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार यांनी माणुसकी दाखवत दहा मिनिटात त्यांच्या टीमसह घटनास्थळी पोहोचून विरूर ग्रामस्थांच्या मदतीने जखमीला खाजगी वाहनात बसवून प्राथमिक आरोग्य केंद्र विरूर येथे आणले. व त्याच्यावर उपचार केले. तरुणाच्या डोक्याला जबर मार लागल्याने रुग्णवाहिकेने राजुरा येथे त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रेफर केले व जखमी युवकावर उपचार सुरु केले.

त्यामुळे मृत्यूच्या तोंडातून जखमी तरुणाचे प्राण वाचले. ही घटना रेल्वे यार्डच्या आत घडली असल्याने ती रेल्वे पोलिस विभागाची आहे. मात्र वेळेपूर्वी महाराष्ट्र पोलिसांचे हेडकॉन्स्टेबल दिवाकर पवार, विजू मुंडे, अतुल सहारे यांनी योग्य वेळी माणुसकी दाखवल्याने एका अनोळखी तरुणाचे प्राण वाचले. याचे परिसरात कौतुक केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here