रिकामटेकड्या मजनूंना आवर लागेल का…?
राजुरा : शहरातील शाळे जवळील चौक तसेच शहरातील मुख्य मार्गावरील चौकात शाळकरी मुलीची छेडखानी प्रकार जरा जास्त सुरू आहे. ग्रामीण भागातून मुली तालुक्याच्या ठिकाणी राजुरात शिक्षण घ्यायला येतात. त्यांच्या मागे राजुरा शहरातील व आजू-बाजूच्या भागातील काही रिकामटेकडे मुल गाड्या घेऊन फिरत राहतात. येणाऱ्या-जाणाऱ्या मुलींची छेडखानी करतात. “त्या मुलींना हे रिकामटेकडे मजनू मूल धमकी सुद्धा देतात. कोणाला काही सांगितले तर तुझी गाठ माझ्याशी आहे. पहिले माझ्या बद्दल कोणालाही विचारून घे, मी कसा आहे ते…!” असा उर्माद दिसून येत आहे.
जोर-जोरात दुचाकी वाहने रस्त्यावर चालविण्याची जणू पैज लागलेली दिसून येत आहे. पंचायत समिती चौक, रेल्वे फाटक, नवीन बस स्टँड या ठिकाणी वाहतूक नियंत्रण कक्ष वाले आधी दिसायचे पण आता ते देखील दिसत नाही. पंचायत समिती जवळील अमृत तुल्य चहा समोर टवाळक्या करणाऱ्या मुलांची दिवस भर गर्दी असते. रस्त्यांवर गाड्या लावून तिथे बसून असतात. सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान येथे मुलींची छेडखानी चे प्रमाण जास्त दिसून येत आहे. असेच जर सुरू राहिले तर नक्कीच मोठी घटना घडू शकते, अशी दाट शंका व्यक्त करण्यात येत आहे. राजुरा प्रशासनाची कुंभकर्णाची झोप उघडून रिकामटेकड्या मजनूंना नक्कीच आवर लागेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.