चुनाळा येथे “जन-वन विकास” योजनेअंतर्गत गॅस वाटप
डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना ; अंगनवाडी व शाळेला दिला लाभ
राजुरा : डॉ. श्यामप्रसाद मुखर्जी जनवन योजना अंतर्गत वन विभाग राजुरा यांनी चुनाळा येथील जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शाळा व पाच अंगणवाडी केंद्रांना नुकत्याच छोटेखानी झालेल्या कार्यक्रमात अन्न शिजविण्यासाठी गॅस चे वाटप राजुरा वन परीक्षेत्र अधिकारी एलकेवाड, वन क्षेत्र सहाय्यक प्रकाश मत्ते यांच्या प्रमुख हस्ते करण्यात आले.
यावेळी वन परिक्षेत्र अधिकारी एलकेवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, राष्ट्रीय वन्यजीव कृती आराखड्याअंतर्गत वने व वन्यजीव संवर्धनासाठी संरक्षित क्षेत्रालगतच्या गावामध्ये ग्रामस्थांचा सक्रीय सहभाग घेऊन ‘जन-वन विकास’ साधण्यासाठी शासनाने ‘ डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजना सुरु केली आहे. लोक सहभागातून वन्य जीव संरक्षण व वणाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
यावेळी ग्राम पंचायतीचे सरपंच बाळनाथ वडस्कर, तलाठी विल्सन नांदेकर, वन रक्षक प्रवीण निखाडे, देवाजी शेंडे, ग्राम विकास अधिकारी मोरेश्वर कोमटी, ग्राम पंचायत सदस्य रवी गायकवाड, राजू कीनेकर, राकेश कार्लेकर, दिनकर कोडपे, सचिन कांबळे, उषाताई करमनकर, वंदनाताई पिदूरकर, जया निखाडे, संतोषी साळवे , संतोषी निमकर, कोमलताई काटम, अर्चनाताई आत्राम, पोलीस पाटील रमेश नीमकर, शिक्षक मडावी, सर्व अंगणवाडी सेविका, ग्राम पंचायत कर्मचारी अनिल वांढरे, वैशाली मुरकूटलावार, रामा शेंडे, गजानन कार्लेकर, विजय चोथले, रवी पामुलवार, राजू कार्लेकर, श्रीराम मडावी, पवन संगरेन उपस्थित होते.