भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघ घुग्घुस कार्यालयातर्फे येथे २३ जुलै भारतीय मजदूर संघ स्थापना दिवस साजरा..
घुग्घुस दि.२३ जुलै २०२२ शनिवार रोजी भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघ घुग्घुस येथील २३ जुलै भारतीय मजदूर संघ स्थापना दिवस आयोजन करण्यात आले,व महामानव डाॅ.बाबासाहेब आंबेडकर, भारत माता,विश्वकर्मा व भारतीय मजदूर संघाचे संस्थापक थोर विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
व तसेच भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाच्या फलकाची पुजा करण्यात आली.
लाॅयड्स मेटल्स कंपनीचे प्रमुख संजय कुमार, देवनाराण गुप्ता,रवि बेले,डाॅ.रितेश वाठ,आदित्य विक्रम सिंग, प्रमोद नाकाडे यांने पुष्पगुच्छ देऊन जिल्हाध्यक्ष प्रमोद येलचलवार ,भा.लाॅ.का.मे.संघ महामंत्री हिवराज बागडे व सर्व सदस्यच्या अभिनंदन केले.
भारतीय लाॅयड्स मेटल कामगार संघाचे अध्यक्ष प्रदीपकुमार वाजपेयी यांनी दूरध्वनीवरून संपर्क करून सदस्यांना मनोगत व्यक्त करण्यात आले, तसेच सांगितले श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांनी स्थापन केलेल्या भारतीय मजदूर संघ या संघटनेला आज, दि. २३ जुलै रोजी ६७ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने…
शून्यापासून शिखरापर्यंत
दि. २३ जुलै, १९५५ . स्थान भोपाळ. देशातील ३५ कार्यकर्ते एकत्र आले आणि त्यांनी विचारविनिमय करुन ‘भारतीय मजदूर संघ’ नावाची संघटना सुरु करण्याचा निर्णय घेतला आणि कामाला प्रारंभ केला. एकही युनियन नाही, सभासद नाही, तसेच कोणीही वलयांकित नेता नाही आणि कार्यकारिणीही नाही ही स्थिती. १२ ऑगस्ट,१९६७ . स्थान दिल्ली. भारतीय मजदूर संघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन. देशभरात १८ राज्यं ५४१ संलग्न युनियन सभासद संख्या २,४६ ,९०२. पहिली राष्ट्रीय कार्यकारिणी घोषित झाली. आता पडताळणी अहवालानुसार, भारतीय मजदूर संघाचे ६२,१५,७९७ सदस्य पहिल्या स्थानावर आहेत.
आभार व्यक्त कोषाध्यक्ष विठ्ठल ठाकरे यांनी केला. यावेळी समीर शील, परशुराम उगे, संतोष चिंत्ताला, मंगेश पचारे, भास्कर कुचनकर, सुधीर बावणे, विजय माथनकर, राजकुमार मुळेवार व कामगार उपस्थित होते.