प्रेरणा काॕलेजने केला गुणवंत भूमीपुञांचा सत्कार

0
724

प्रेरणा काॕलेजने केला गुणवंत भूमीपुञांचा सत्कार

स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेत अॕड. दीपक चटप व प्रतीक बोरडे यांनी केले मार्गदर्शन

 

 

गडचांदूर : स्पर्धेचे युग आता केवळ गाव, जिल्हा, राज्य, देशापुरते मर्यादित राहीलेले नाही. सातासमुद्रापार आपलं कर्तृत्व गाजवण्याची ही वेळ आहे. प्रामाणिक परिश्रमाने आपल्या कार्याचा ठसा जगभरात उमटवण्याचा ध्यास आपण घेतला पाहिजे. त्यासाठी विद्यार्थ्यांनो आता जागतिक स्पर्धेसाठी सक्षम व्हा, असे आवाहन ब्रिटिश सरकारचा चेव्हनिंग ग्लोबल लीडर ॲड.दीपक चटप यांनी केले. प्रेरणा प्रशासकीय महाविद्यालयाच्या वतीने बालाजी सभागृहात आयोजित स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव ठेंगणे तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक शिंदे, बोरीकर, माजी जि.प.सभापती अरुण निमजे, भाऊराव झाडे, बालाजी पुरी, अविनाश पोईनकर, रमेश राठोड, संतोष पाल, चेतना चव्हाण, स्वप्निल जेनेकर, मंदे, पुंजेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

ब्रिटीश सरकारची ४५ लाखांची जागतिक प्रतिष्ठेची चेव्हनिंग शिष्यवृत्ती मिळवणारे देशातील पहिले तरुण वकिल ॲड.दीपक चटप व कोरपना येथील राज्यसेवेतून नवनियुक्त नायब तहसीलदार पदी निवड झालेले प्रतिक बोरडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

प्रतिक बोरडे यांनी स्पर्धा परिक्षेची तयारी करतांना समर्पित भावनेने अभ्यासाशी नाते जोडणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करत आपल्या यशाचा प्रवास उलगडला. गडचांदूरात स्पर्धा परिक्षेचे वातावरण निर्मीतीसाठी प्रेरणा प्रशासकिय महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे आहे, असे मत माजी जि.प.सभापती अरुण निमजे यांनी व्यक्त केले. विद्यार्थी देश विकासाचा पाया आहे. देशासाठी स्वत:ला घडवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन अध्यक्षस्थानाहून नामदेव ठेंगणे यांनी केले. शाहिर संभाजी ढगे यांनी स्वागतगिताने कार्यक्रमात रंगत आणली‌. संचालन प्रा.नानेश धोटे, प्रास्ताविक प्रा.राहूल ठोंबरे तर आभार प्रा.शितल चन्नेकर यांनी मानले.

प्रेरणागीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने महाविद्यालय तसेच परिसरातील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.देरकर सर,प्रा.मडावी सर,प्रा.मनीषा मॅडम,रेणू मॅडम यांनी विशेष सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here