त्या चंदू च्या मदतीला पुढे आले 34 वर्षांपूर्वीचे विद्यार्थी

0
1120

त्या चंदू च्या मदतीला पुढे आले 34 वर्षांपूर्वीचे विद्यार्थी

राजुरा: शहरातील प्रख्यात इंग्रजी शाळा इन्फंट जिझस इंग्लिश स्कूल ह्या शाळेतील काही माजी विद्यार्थ्यांनी शाळा सोडून चक्क ३३-३४ वर्षानंतर सर्व शिक्षक वर्ग आणि विद्यार्थांना एकत्र करून भेट समारंभ आयोजित करण्याची भन्नाट कल्पना आली. या कार्यक्रमात शाळेचे संस्थापक ई. एम. डेविड सर व त्यांची पत्नी मेरी मॅडम सोबतच सर्व माजी शिक्षक, शिक्षिकांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमात सतत 7-8 वर्ष चपराशी च्या पदावर सेवा देणाऱ्या चंदु  या नावाने ओळख असलेल्या चंद्रशेखर बोरकर यांना ही विशेष रूपाने आमंत्रित करून त्यांचे ही सत्कार करण्यात आले.

शाळेत चपराशी असलेल्या चंदुला स्टेज वर बोलाऊन त्यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन त्याचा सत्कार करण्यात आला. त्याच्या कंबरेतील हाडाला गंभीर दुखापत असूनही आपल्या शाळेतील मुलांच्या विनंतीवर चंदु सर्वांची भेट घेण्याकरिता आला होता. आयोजक विद्यार्थ्यांनी स्टेजवर त्याच्या हाताने घंटी वाजवून शाळेच्या काळातील जुनी आठवणी जिवंत करण्यात आली. चालायला पण अशक्त झालेल्या चंदू ला स्टेजवर घंटी वाजवत बघणाच्या हा क्षण चंदु सह सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या मनाला भरावून घेणारा ठरला. चंदु साठी आधीच नवीन कुर्ता पायजामा टोपी आणि त्याच्या पत्नीला नवीन साडी देण्यात आली होती. शिवाय विद्यार्थ्या तर्फे चंदुला 3000 रू. ची अन्नाची किट उपहार स्वरूप देण्यात आली. शुभ्र पांढरे कपडे घालून चंदु किती छान दिसत होता. मावळत्या वयामुळे त्याची शारीरिक आणि आर्थिक स्थिती हलाखीची असल्याचे लक्षात आल्याने काही विद्यार्थ्यांनी त्याच्या मुलीच्या लग्नाकरिता आर्थिक मदत देण्याचे ठरवले आणि कार्यक्रमाला उपस्थित सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांना चंदुला आर्थिक मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. या शुभ कार्यासाठी मसूद अहमद सरांनी 1100 रू. आणि दिलीप सदावर्ते सरांनी 1100 रू. सर्वप्रथम दिले. बघता बघता चंदु च्या मदतीला अनेक शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य करत एकूण 80,000 रू. जमा केले. त्यातील 5000 रू. त्याच्या घरी जाऊन नगदी देण्यात आले आणि 75,000 रुपयांची त्याच्या नावाची एफ. डी. बनण्यात आली.

विद्यार्थ्यांच्या आव्हानांवर अनेक विद्यार्थ्यांसोबतच शाळेचे माजी मुख्याध्यापक मसूद अहमद सर, शिक्षक दिलीप सदावर्ते सर, सूरज सर, अशोक मेडपल्लिवार सर, डॉ. सत्यवान काटकर सर, संध्या पाटील मॅडम, सरोज लेखराजनी मॅडम, ज्योत्स्ना चव्हाण मॅडम, स्वाती देशपांडे मॅडम, नंदा आमिडवार मॅडम, आदि शिक्षक शिक्षिकांनी चंदुसाठी आर्थिक सहयोग केले.

चंदुला आर्थिक सहयोग करण्यासाठी बजाज बंधू, धनराज सिंह शेखावत, हरभजन सिंह, हितेश डाखरे, ओभैय्या दासरी, लक्ष्मण गुप्ता, उपेंद्र गुप्ता, पि. सी. नवीन, प्रफुल जूनघरे, गुलिंदर कौर, सुधीर नथानी आदिनी विशेष सहयोग केले. मानव हित जोपासणाऱ्या या कार्याची सर्वत्र प्रसंशा होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here