अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाउंडेशन आवारपूर तर्फे शेतकरी मार्गदर्शन व कार्यशाळा संपन्न
आवाळपुर :- उत्तम शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. याचा विचार करत अल्ट्राटेक कम्युनिटी वेलफेयर फाउंडेशन आवारपूर ने गावातील शेतकऱ्यांसाठी श्री. गजानन जाधव, लेखक व्हाईट गोल्ड (एक नवी दिशा) यांच्या मार्गदर्शना चे आयोजन ए. सी. डब्ल्यू. स्पोर्ट क्लब, आवारपूर सिमेंट वर्क्स येथे करण्यात आले.
या कार्यक्रमात अल्ट्राटेक चे युनिट हेड श्रीराम पी. एस. यांच्या हस्ते गजानन जाधव यांचे शाल आणि श्रीफळ देऊन तर कर्नल दीपक डे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला शेजारील गावातील जवळपास दोनशे शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी माजी सरपंच सचिन बोंडे सांगोळा, ग्रामपंचायत आवाळपुर चे उपसरपंच बाळकृष्ण काकडे, उपसरपंच शत्रुघन शेडमाके नोकारी यांची उपस्थिती होती. युनिट हेड श्रीराम पी. एस. यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही सदैव तत्पर राहू, व असे नवनवीन उपक्रम राबवू. तसेच कर्नल दिपक डे यांनी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. प्रमुख मार्गदर्शनात गजानन जाधव सर यांनी शेतकऱ्यांना फवारणी, पिकांची वाढ, नवीन पिक, जमिनीची उपज, कीटक नाशके, खत, बियाणे व नवीन उत्पादन यावरती किमान दोन तास मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान सुद्धा केले. व आपल्या मार्गदर्शनाच्या पुस्तकांचे वितरण सुद्धा केले. कार्यक्रमाच्या शेवटी शेतकऱ्यांनी उत्तम असा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल अल्ट्राटेक चे आभार मानले.या कार्यक्रमाचे चे आयोजन कर्नल दिपक डे यांच्या मार्गदर्शनात सी. एस .आर .प्रमुख सतीश मिश्रा ,सचिन गोवारदिपे, डॉक्टर गोदावरी नवलानी विशेष करून संजय ठाकरे व देविदास मांदाळे यांनी अथक प्रयत्न केले.