तीन दिवसात 15 शेळ्यांचा साथीच्या रोगाने मृत्यू

0
740

तीन दिवसात 15 शेळ्यांचा साथीच्या रोगाने मृत्यू

तब्बल एक लाख पन्नास हजाराचे नुकसान

आपत्तीग्रस्ताला तात्काळ मदत द्या शुभम मंडपे यांची मागणी

 

मौजा चिचाळा (शास्त्री) येथील बुधाराम तातोबा सुखदेवें यांच्या तीन दिवसांमध्ये 15 शेळ्यांचा साथीच्या रोगाने मृत्यू झाला, यात तब्बल एक लाख पन्नास हजाराचे (150,000) नुकसान झालं आहे. यामध्ये दहा शेळ्या व तीन बोकड, दोन पाटांचा समावेश आहे. सध्या चंद्रपुर जिल्ह्यासह चिमूर तालुक्यामध्ये पावसाच्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व शेतमजूर हतबल झाला आहे. चिमूर तालुक्यात सतत आलेल्या 20 दिवसाच्या पावसाने अनेक साथीचे रोग पाळीव जनावरांवर ग्रासले आहेत. अशातच चिंचाळा (शास्त्री) येथील अपत्तीग्रस्त बुधाराम तातोबा सुखदेवे यांच्यावर तीन दिवसात 15 शेळ्यांच्या मृत्यूने खूप मोठं संकट कोसळले आहे. यामुळे समाज कार्यात अग्रेसर असणारे, आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य व वंचित बहुजन युवा आघाडी चे चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष शुभम मंडपे यांची अपत्तीग्रस्त पीडिताला प्रशासनाने तात्काळ मदत घ्यावी, अशी मागणी केली आहे.

या प्रकरणाची दखल न घेतल्यास आंदोलनही करू असा इशारा दिला आहे. संपूर्ण चिमूर तालुक्यात पी.पी.आर व निमोनियाच्या लसीकरणाची शिबिरे प्रशासनाने व पशु वैदकीय विभागाने राबवावी, असे आवाहन केले आहे. मौजा चिंचाळा (शास्त्री) येथील आपत्तीग्रस्त बुधाराम तातोबा सुखदेवें यांना प्रशासनाने तात्काळ मदत करावी अशी मागणी केली आहे.

“अतिवृष्टीमुळे जनावरांवर साथीच्या रोगामुळे 15 शेळ्यांचा मृत्यू झाला त्यामुळे बुधारामजी सुखदेवें यांना प्रशासनाने तात्काळ मदत घोषित करावी व संपूर्ण चिमूर तालुक्यातील गावागावात मदत व उपाययोजना जाहीर कराव्यात”शुभम मंडपे ग्रामपंचायत सदस्य, आंबोली

 

यावेळी या प्रकरणाची माहिती मिळाली असता आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम मंडपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळावर जाऊन आपत्तीग्रस्तांची भेट घेत तात्काळ तालुका पशु वैदकीय अधिकारी जांभुळे व पशु वैदकीय अधिकारी देशमुख मॅडम शंकरपूर यांना कळविण्यात आले. त्यांनी तात्काळ येऊन मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा व पोस्टमार्टम करण्यात आला. याची माहिती स्थानिक तलाठी दोडके मॅडम यांनाही कळविण्यात आली. यावेळी या शेळ्यांचा मृत्यू हा पी.पी.आर. व निमोनिया या रोगाने झाला आहे असा अंदाज पशु वैदकीय अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

यावेळी घटनास्थळी पशु वैदकीय अधिकारी जांभुळे, देशमुख मॅडम शंकरपूर, निलेश धानोरे पशुवैदकीय अधीकारी शंकरपूर व अपत्तीग्रस्त बुदाराम सुखदेवें, आंबोली ग्राम पंचायत चे सदस्य शुभम मंडपे, सामाजिक कार्यकर्ते मनोज सरदार, मधूकर नागपुरे, सुधाकर राऊत, प्रकाश भषारकर, विवेक मुन, सुमेध मुन, बालकदास सुखदेवे सह आदी उपस्तीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here