घुग्घुस लॉयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीत वार्षिक वैद्यकीय आरोग्य तपासणी संपन्न
घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीत दिनांक १८ जुलै २०२२ सोमवार ते २२जुलै २०२२ शुक्रवार पर्यंत वार्षिक वैद्यकीय आरोग्य तपासणीचे ५ दिवस आयोजन करण्यात आले होते.
महाराष्ट्र कारखाना अधिनियम १९६३ (१८)अ नुसार घुग्घुस येथील लॉयड्स मेटल्स अँन्ड एनर्जी लिमिटेड कंपनीत वार्षिक वैद्यकीय आरोग्य तपासणीचे आयोजन करण्यात आले होते.
यास कंपनीच्या सर्व कामगार व कर्मचाऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. कामगार तथा कर्मचारी यांची आरोग्य तपासणी, सुरक्षा व आरोग्य विभाग, मुंबईचे मान्यता प्राप्त डॉ. शशांक दांडगे नागपूर यांच्या मार्फत आरोग्य तपासणी करण्यात आली जवळपास स्थायी,अस्थायी,चौकीदार व स्टाफ कर्मचारी कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. कंपनीचे मुख्य चिकित्सक अधिकारी डॉ. रितेश वाठ व त्यांचे सहकारी धनंजय सांगुळले यांच्या मार्गदर्शनात तपासणी संपन्न झाली.
कंपनीच्या युनिटचे प्रमुख श्री. संजय कुमार, प्रकल्प प्रमुख श्री. दिनेशकुमार पाटीदार, एच.आर विभागाचे उपाध्यक्ष श्री. प्रशांत पुरी, ऑपरेशन विभागाचे उपाध्यक्ष गुणाकर शर्मा यांनी वैद्यकीय चमूचे व एच.आर विभागाचे अभिनंदन करण्यात आले.