वानखेडे विद्यालयात वाढदिवसानिमित्त सारडा परिवारातर्फे विद्यार्थ्यांना गणवेश व ब्लॅंकेट चे वितरण
चंद्रपूर जिल्ह्यातील सुपरिचित सामाजिक कार्यकर्ते मा. घनश्यामदासजी सारडा यांचा 75 वा वाढदिवस त्यांच्या परिवारानी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना गणवेश व ब्लॅंकेट चे वितरण करून करण्याचे ठरविले. त्यानुसार नांदगाव पोडे येथील स्व. गोपाळराव वानखेडे विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे आज कार्यक्रमाचे आयोजन मा. घनश्यामदासजी सारडा, गोपालजी सारडा, बजरंगजी सोनी, उमेश सारडा, निर्मलाजी सारडा पूजा सारडा, रक्षाजी हुरकट, कविताजी मेहता तसेच संपूर्ण सारडा परिवार तसेच शाळेचे राज्य पुरस्कार प्राप्त प्राचार्य नरेंद्र बोबडे यांचे उपस्थितीत करण्यात आले.
प्रथमतः शाळेतील लेझीम पथकानी पाहुण्यांना कार्यक्रम स्थळी आणले व कार्यक्रमाचे औचित्याने शाळेत वृक्षायरोपन करुन मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली,,यावेळी वाढदिवसानिमित्या सारडाजी यांचा शाळेच्या वतीने शाल श्रीफळ व रोपटे देऊन देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
प्रास्तविक भाषणातून शाळेचे प्राचार्य बोबडे यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना जिल्ह्यातील सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सहकार्य मिळवून देऊन शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षक अहोरात्र मेहनत घेत असतात त्यामुळेच जिल्ह्यात शाळेचा नावलौलकीक असल्याचे सांगून सारडाजी यांनी सुद्धा शाळेतील 100 मुलांना गणवेश व ब्लॅंकेट चे वितरण केल्याबद्दल मनपुर्वक धन्यवाद दिले, यावेळी श्री. व सौ. सारडा यांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागातील शाळा निसर्गरम्य वातावरनात इतकी सुंदर शाळा आणि अतिशय शिस्त प्रिय विद्यार्थी असू शकतात हे चित्र बघून खऱ्या अर्थाने आमच्या वडिलांचा वाढदिवस अतिशय योग्य ठिकाणी साजरा करीत असल्याचा मनापासून आनंद होत असल्याचे मनोगतातून व्यक्त केले.
यावेळी सारडा परिवार तर्फे शाळेतील 100 गरजू विद्यार्थ्यांना ड्रेस व ब्लॅंकेट चे वितरण करण्यात आले,कार्यक्रम घडवून आनण्यासाठी शाळेतील शिक्षक नांदेकर मॅडम उईके मॅडम यांनी मोलाची भूमिका बजावली. कार्यक्रमाचे संचालन श्री बंडू काकडे यांनी तर आभार सौ सारिका कुचनकर यांनी मानले. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.