वर्धा नदीच्या पुरामुळे राजुरा शहर वासीयांना दोन दिवस पाणीपुरवठा बंद
राजुरा शहरातील सर्व नागरिकांना नगर परिषद प्रशासनाने जाहीर सूचना दिली आहे. वर्धा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यामुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे राजुरा पाणी पुरवठा मुख्य स्त्रोत कोलगाव हेड वर्क्स वरील पंप व विद्युत पुरवठा बंद करण्यात आला आहे. तसेच सदर पूरच्या पाण्याच्या पातळीत गतीने वाढ होत असल्यामुळे तसेच कोलगाव हेड वर्क्स कडे जाणारे सर्व रस्ते बंद असल्यामुळे विद्युत पुरवठा व पंप सुरु करणे शक्य नाही. करिता शहराला दोन दिवस पाणी पुरवठा करता येणार नाही. यामुळे नगर पालिका मार्फत कुपनलिका व पाणी टँकर द्वारे पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
शहरात पाणी टँकर ची गरज असल्यास ऋषी झाडे (9405776059), अनुप करमरकर (7756912650) या कर्मचाऱ्यांना संपर्क साधावा. तसेच राजुरा शहर वासीयांनी याची नोंद घेत पाण्याचा जपून वापर करावा. नगर परिषदेस सहकार्य करावे. असे आवाहन नगर परिषद राजुरा चे मुख्याधिकारी यांनी केले आहे.