30 वर्षात अगस्ती सहकारी साखर कारखाना 250 कोटी कर्जात कसा?
अजित पवारांनी केला पिचड यांना प्रश्न…
अहमदनगर
संगमनेर (दिनांक १७/७/२०२२)
प्रतिनिधी/ज्ञानेश्वर गायकर पाटील
अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रचार ऐन भरात आला असून महा विकास आघाडी पुरस्कृत शेतकरी समृध्द मंडळ आयोजित , आज राष्ट्रवादी चे नेते माजी उप मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज अकोले येथे प्रचार सभा पार पडली, तेव्हा पवार बोलत होते.
अगस्ती सहकारी साखर कारखाना ची पंच वार्षिक निवडणूक सद्या अनेक आरोप , प्रत्यारोप ने गाजत असून, भाजप विरुद्ध महा विकास आघाडी असा सरळ सामना होत आहे.आज अकोल्यात विरोधी पक्ष नेते अजित पवार यांची मोठी सभा झाली, भर पावसात लोक सभा ऐकण्यास आले होते. सुमारे पाच हजार हून अधिक लोक सभा ऐकण्यास आल्याने पुन्हा एप्रिल २०१९ ची पुनरावृत्ती होणार का, या कडे लक्ष लागले आहे.
एक तासाच्या भाषणात अजित पवार यांनी पिचड यांच्यावर अप्रत्यक्ष मोठी टीका केली. अकोले पासून वीस किलोमिटर वरील संगमनेर कारखाना, दूध संघ , शिक्षण संस्था चांगल्या निर्माण होतात , मग अकोले तालुक्यात का नाही, असा सवाल करून गेल्या तीस वर्षात कारखान्यात अपेक्षित तांत्रिक बदल न करता , अन्य प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कोणता ही ठोस निर्णय घेतला नसल्याचे अजितदादा पवार यांनी पिचड यांचे नाव न घेता त्यांना कानपिचक्या दिल्या.
महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर बोलताना पवार म्हणजे की, राज्यातील हे सरकार फार काळ टिकणार नाही ,याची खिल्ली उडवताना त्यांनी अजून मंत्रिमंडळ होतच नाही ही शोकांतिका आहे. राज्यात अतिवृष्टी असताना राज्याला मालकच नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. अकोले तालुक्यात मी अर्थ मंत्री असताना सुमारे ५०० कोटी चा निधी दिला याची ही त्यांनी आठवण करून दिली.
सीताराम गायकर यांच्या नेतृत्वाखाली अगस्ती सहकारी साखर कारखाना उंच भरारी घेईल. शेतकऱ्यांना उसाला चांगला भाव दिला जाईल , अनेक प्रकल्प उभे करून कारखाना कर्ज मुक्त करू , या करिता वाटेल ती किंमत मोजून संचालक मंडळाच्या पाठीशी आम्ही उभे राहू , अशी ग्वाही ही त्यांनी दिली. शेतकरी समृध्दी मंडळाचे सर्व उमेदवार सक्षम, अनुभवी असून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करणे हे मतदारांचे काम आहे असे ही पवार पुढे म्हणाले, त्यांनी या वेळी कैलासराव वाकचौरे यांचे विशेष कौतुक केले.
अजित दादा पवार अकोले तालुक्यातील आदिवासी परिसरात अतिवृष्टी ची पाहणी करण्यासाठी आदिवासी भागात गेले असता, येताना भाजप समर्थकांनी त्यांचा ताफा अडवला .या वेळी पिचड यांना समर्थन देणारे दशरथ सावंत यांना पोलिसांनी अटकाव केल्याने , व अजित पवारांनी भेट नाकारल्याने काही पंधरा ,वीस भाजप समर्थकांनी ताफा अडवला , अजित पवारांनी आपल्या शैलीत त्यांना उत्तर दिले.
दरम्यान अतिवृष्टीचे कारण देता उद्या होणारे मतदान प्रक्रिया पुढे ढकलून प्रशासन ने एक अजब निंर्णय घेतला असल्याचे वृत्त रात्री उशिरा हाती आले आहे. सरकारचे व अगस्तीचे काही करोडो रुपये वाया जाणार की निवडणूक होणार हे उद्या कळेल, सदर आदेश उद्या होणाऱ्या मतदानास लागू होईल की नाही या बाबत कोणते स्पष्ट आदेश नाहीत. मात्र सीताराम गायकर यांच्या शेतकरी समृध्द मंडळ यांनी औरंगाबाद खंडपीठ मध्ये जाण्याची तयारी केली आहे. खंडपीठात तातडीची सुनावणी होऊन अगस्ती बाबत योग्य निर्णय होईल याची खात्री श्री अशोक भांगरे यांनी दिली.खंडपीठाचा निर्णय येईल तेव्हा निवडणूक प्रक्रिये बाबत समजेल.दरम्यान या बाबत तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून , आमदार किरण लहामटे, अशोक भांगरे , सीताराम गायकर, मधुकर नवले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृध्दी मंडळ यांना मिळणारा वाढता पाठिंबा हेच एकमेव कारण असल्याचे लोक उघड बोलत आहेत.
या वेळी आमदार किरण लहामटे यांनी ही पिचड पिता पुत्र यांचा खरपूस समाचार घेतला. अशोक भांगरे,शेतकरी नेते अजित नवले, अमित भांगरे , सीताराम गायकर, मधुकर नवले, मारुती मेंगाळ , शांताराम वाळुंज, विजयराव वाकचौरे , वसंतराव मणकर , महेश नवले आदींची भाषणे झाली.. मोठा जनसमुदाय या सभेस भर पावसात लोटला होता, महिला मतदार यांची उपस्थिती ही लक्षणीय होती.