सर्वसामान्यांच्या नुकसानीची भरपाई द्या….! आम आदमी पार्टी घूग्घुस
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र मध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सर्वत्र पुर स्थिती निर्माण झालेली आहे.यातच १० दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घूग्घुस गावातील स्थानिक नागरिकांचे घर कोसळलेले आहे ज्यामुळे हे नागरिक बेसहारा झालेले आहे ही खूप दुर्दैवी बाब आहे. गावातील गोर गरीब लोकांकडे पडलेल्या घराची दुरुस्ती करण्याकरिता कुठलेही सहाय्य नाही ही बाब लक्षात घेता आम आदमी पार्टी घूग्घुस द्वारा तलाठी कार्यालय घूग्घुस व नगरपरिषद कार्यालय घूग्घुस इथे निवेदन देण्यात आले व गावातील नागरिकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी शहर अध्यक्ष अमित बोरकर, उपाध्यक्ष अभिषेक सपडी, सचिव संदीप पथाडे, सहसचिव विकास खाडे, सह संघटनमंत्री आशिष पाझारे, रवी शांतलावार, प्रशांत सेनानी, प्रफुल पाझारे, निखिल कामतवार, अनुप धणविजय, अनुप नळे, करण बिऱ्हाडे, संतोष सलामे, प्रशांत पाझारे, कुलदीप पाटील, महिला शहर अध्यक्ष उमा तोकलवार, महिला उपाध्यक्ष सोनम शेख, महिला सचिव विपश्यना धनविजय, महिला कोषाध्यक्ष अंजली नगराळे, महिला संघटनमंत्री पुनम वर्मा, रिना पेरपूल्ला, शामला तराला, धम्मदिना नायडू, नईमा शेख, कविता विष्णु भक्त, शोभाताई इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.