विरुर (स्टे) पोलिसांची धाडसी कामगिरी कौतुकास्पद – देवराव भोंगळे

0
639

विरुर (स्टे) पोलिसांची धाडसी कामगिरी कौतुकास्पद – देवराव भोंगळे

 

 

राजुरा : जिल्ह्यात मागील पाच ते सहा दिवसांपासून सतत अतिवृष्टी होत आहे. सर्वत्र नदी-नाल्याना पूर आला आहे. राजुरा तालुक्यातील विरूर स्टे. जवळ असलेल्या नाल्यात चालकाच्या चुकीने बस पुराच्या पाण्यात अडकली व अडकलेल्या ३५ प्रवाशांना विरूर पोलीस ठाण्याच्या पथकाने व नागरिकांच्या धाडसी कामगिरीने सर्वाना सुखरूप बाहेर काढून प्राण वाचविले. यामुळे सर्वसामान्यांमध्ये पोलिसांप्रती असलेली प्रतिमा उंचावली असून पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून केलेले हे धाडसी कार्य कौतुकास्पद असल्याचे भाजपाचे जिल्हाध्यक्ष ताठ माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराव भोंगळे यांनी व्यक्त केले.

हैदराबाद कडून चिंचोली विरुर मार्गे छत्तीसगड कडे जाणारी ट्रॅव्हल्स चिंचोली नाल्यात अडकल्याने प्रवाश्याचा जीव टांगणीला लागला होता परंतु विरुर पोलिसांना माहीत होताच लगेच मदत करीत मोठ्या परिश्रमातून सर्व प्रवाशांना बाहेर सुखरूप काढले त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

तेलंगणात कामासाठी गेलेले मजूर परत आपलय छत्तीसगड राज्यात खाजगी ट्रॅव्हल्स ने निघाले तेलंगणातील शिरपूर मार्गे चिंचोली विरुर मार्गे येत असताना चिंचोली नाल्यातील पुलावर पाण्याचा अंदाज न घेता ट्रॅव्हल्स टाकली आणि त्यात फसली सगळीकडे पाणीच पाणी जीव वाचविण्याची धडपळ सुरू झाली एकाने पोलिसांच्या 112 क्रमांकावर फोन करून माहिती दिली विरुर पोलिसांना संदेश आला आणि क्षणाचाही वेळ न लावता सहायक पोलिस निरीक्षक राहुल चव्हाण आणि पोलीस ठाण्यातील सर्व कर्मचारी घटनास्थळी जाऊन रेस्क्यू मोहीम सुरू केली काही ग्रामस्थाच्या मदतीने मोठ्या प्रयत्नाने जीव धोक्यात घालून बस मधील 25 लहान बालकासह पुरुष महिला प्रवाश्याना सुखरूप बाहेर काढले लगेच त्यांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली. पोलिसांनी केलेली ही कामगिरी साहसी असून या पथकातील सर्व पोलीस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचे अभिनंदन देवराव भोंगळे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here