सध्या माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखे काही नाही पण तुमची ताकद मला द्या…, परत एकदा आपण जोमाने उभे राहू…!
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसैनिकांना जिंकले
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई दि. १२ : आता माझ्याकडे तुम्हाला देण्यासाठी काहीही नाही परंतु तुम्हीची ताकद मला हवी आहे. सध्या तुम्हाला विदाऊट तिकीट प्रवास आपणास सध्या करावा लागणार आहे. लढायचे असेल तर सोबत राहा, भाजपाचा शिवसेनेला संपवण्याचा डाव आहे, असा पुनरुच्चार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मातोश्री येथे पुणे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची व सर्व नगरसेवकांची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी त्यांना मार्गदर्शन करत असताना भाजपासह शिवसेनेतून बंड करून निघालेल्या आमदारांवर टीका केली. तसेच हिंमत असेल तर मध्यावधी निवडणूक घेऊन दाखवा, असे आव्हानही दिले. सध्याच्या घटनेवरून त्यांनी राज्यात कशापद्धतीने घटनेची पायमल्ली करून कारभार सुरू आहे, याची माहिती दिली. एकीकडे न्यायालयात बंडखोर आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न प्रलंबित असताना दुसकीकडे बहुमत चाचणी, विश्वासदर्शक ठराव मांडला जातो, यावर त्यांनी बोट ठेवले. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या विरोधात आता शिवसेना न्यायालयाचे दरवाजेही ठोठावणात असून अरुणाचल प्रदेश सारखा निकाल लागण्याची शक्यता असल्याचे देखील श्री ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी बोलताना त्यांचे मन भावुक झाले होते. त्या म्हणाल्या की यापुढे आपण एक जुटीने व ताकतीने काम करायचे आहे.
मा. ऊद्धवसाहेबांनी भेट व त्यांनी घेतलेली साद यांनी पुण्याच्या शिवसैनिकांना जिंकले.