प्रभाग क्रमांक 10 मधुन स्वत: सुरेश मल्हारी पाईकराव निवडणूक लढणार व अन्य प्रभागामधुन निवडणूक लढविणार…
घुग्घुस : नगर परिषद घुग्घुस येथील नुकत्याच आरक्षण सोडत जाहीर होता घुग्घुस मध्ये खडबड उडत आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार आणि कुणाला निवडुन आणायचे हा गंभीर प्रश्न जनतेसमोर पडला आहे.
काही पक्ष सत्तावीस तर काही बावीस वर्षापासून या घुग्घुस मध्ये आपली सत्ता गाजवत होते. परंतु घुग्घुस येथील समस्या व बेरोजगारीचा प्रश्न तसेच जेव्हा दवाखाना मंजूर होऊन सुद्धा दवाखाना बांधण्यास विलंब लावणे, घुग्घुस ला नगर परिषदचा दर्जा मिळवून देण्यास विलंब लावणे, पाण्याची समस्या, उडाण पुलाची समस्या, प्रदूषण अशा अनेक समस्यांमुळे घुग्घुस येथील नागरिक त्रस्त झाले होते.
नवनवीत चेहरा जनतेच्या समोर आला. तो चेहरा म्हणजे सुरेश मल्हारी पाईकराव. कुठलही पद नसताना सुद्धा जनतेसाठी, घुग्घुस येथील नागरिकांसाठी, त्यांच्या हक्कासाठी आंदोलने करून प्रश्न सोडविण्याचे धोरण सुरेश मल्हारी पाईकराव यांनी हाती घेतले. मग प्रश्न दवाखान्याचा असो की कोणताही पाईकराव यांनी जनतेच्या समस्येचे समाधान करत असत. 2014 मध्ये घुग्घुस येथील 30 खाटांचा दवाखाना मंजूर असून तो घुग्घुस येथील जनतेला उपचारासाठी बनवून दिला नाही. त्यासाठी सुरेश मल्हारी पाईकराव यांनी आंदोलन करुन दवाखान्याचे रखडलेले काम सुरू करवून घेतले आहे.
घुग्घुसला नगर परिषदचा दर्जा मिळवून देण्यासाठी सुद्धा खुप मोठे योगदान पाईकराव यांचे आहे. हे घुग्घुस जनतेला माहितच आहे. जर आज सुरेश मल्हारी पाईकराव नसते तर आणखी घुग्घुस ला नगर परिषद चा दर्जा मिळाला नसता. म्हणुन आज घुग्घुस जनतेची आवड म्हणून सुरेश मल्हारी पाईकराव व त्यांची टिम हे घुग्घुस नगर परिषद निवडणुकीत निवडून येईल अशी घुग्घुस नाहीतर चंद्रपूर मध्ये सुद्धा चर्चा सुरू आहे.