त्या मोठ्या घोषणांमध्ये विज उत्पादक जिल्हांना २०० युनिट विज मोफत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी करावी – आ. किशोर जोरगेवार

0
726

त्या मोठ्या घोषणांमध्ये विज उत्पादक जिल्हांना २०० युनिट विज मोफत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री यांनी करावी – आ. किशोर जोरगेवार

 

 

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यासाठी काही मोठ्या घोषणा करणार आहेत. यात ९ विज उत्पादक जिल्ह्यांना घरगुती वापरातील २०० युनिट विज मोफत देण्याची घोषणाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी अशी मागणी आज मुख्यमंत्री यांच्या अभिनंदन प्रस्तावावर सहभागृहात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

 

आज नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अभिनंदन प्रस्ताव घेण्यात आला. यावर बोलतांना चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी पुन्हा एकदा विज उत्पादक जिल्हांना घरगुती वापराची २०० युनिट विज मोफत देण्याची मागणी केली आहे. चंद्रपूर जिल्हा हा ५ हजार मेगॅव्हट पेक्षा अधिक विज उत्पादन करतो. त्यामूळे ५० टक्के वनआच्छादन असुन सुध्दा हा जिल्हा देशात ४ क्रमांकाचा प्रदूषित जिल्हा म्हणुन ओळखला जातो. त्यामुळे येथील नागरिकांसह ९ विज उत्पादक जिल्ह्यांना मोबदला म्हणून घरगुती वापराची २०० युनिट विज मोफत देण्यात यावी. तसेच येथील उद्योगांना सवलतीच्या दरात विज देण्यात यावी असे बोलत मुख्यमंत्री ज्या मोठ्या घोषणा राज्यासाठी करण्यात येणार आहेत यात सदर घोषणाही मुख्यमंत्री यांनी करावी अशी मागणी यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

 

तसेच यावेळी बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी गेले १२ दिवस मुख्यमंत्री यांचा सहवास लाभला यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो असे म्हटले. या दरम्याण अनेक प्रसंग घडले अनेकदा सांगितल्या गेले कि संख्या होईल की नाही, काही आमदारांचे निलंबन होईल मात्र अशा परिस्थितीही ते खंबीर राहिले. अपक्ष हा अनाथ असतो त्यामुळे मुख्यमंत्री हे आमचे नाथ बनेल अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाव रुपाने महाराष्ट्राला लाभलेल्या या जोडीची जग नोंद घेईल या सरकारच्या माध्यमातुन अनेक विकासाची कामे होईल असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे लोकनाथ होऊन विकास करेल असेही ते यावेळी म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here