मदर हु ईन्सपायर पुरस्कार प्रदान झाल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्हिडीओ कॉल करत अम्माला दिल्या शुभेच्छा !
सकाळ समुहाच्या वतीने आज नागपुर येथे ना. नितिन गडकरी यांच्या हस्ते दिला जाणार पुरस्कार
कष्ट हाच यशाचा मुलमंत्र आहे असा संदेश देणा-या अम्माला सकाळ गृप तर्फे महाराष्ट्र आयडल या उपक्रमा अंतर्गत मदर हु ईन्सपायर हा पुरस्कार जाहिर झाला आहे. अम्माला पूरस्कार जाहिर झाल्याबदल आज राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉल करत अम्माला शुभेच्छा देत त्यांचा आर्शिवाद घेतला आहे. तसेच मुंबईला वर्षा बंगल्यावर आमंत्रित केले आहे.
चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या मातोश्री गंगुबाई जोरगेवार म्हणजेच अम्मा यांच्या कार्याची दखल घेत सकाळ समुहातर्फे त्यांना महाराष्ट्र आयडल उपक्रमा अंतर्गत मदर हु ईन्सपायर हा पूरस्कार प्रदान करण्यात आला आहे आज नागपूर येथे राष्ट्रीय महामार्ग परिवहण मंत्री नितिन गडकरी यांच्या हस्ते प्रदान केल्या जाणार आहे.
कष्ट आणि प्रामाणिकपणा हा मुलमंत्र जोपासत एका माऊलीने काबाडकष्टाने मुलांना घडविले आज एक मुलगा आमदार झालाय तर दुसरा मुलगा चंद्रपूरातील प्रसिध्द व्यावसायिक आहे. असे असतांना एकेकाळी गरिबीचे चटके सोसणाऱ्या त्या माऊलीने कष्टाचा मार्ग सोडलेला नाही. ती आजही शहरातील सात मजली ईमारतीखाली टोपल्या विकण्याचे काम नित्यनियमाने करत आहे. कष्ट करायला लाज कशाची अशी शिकवण ती आज समाजाला देत आहे. त्या माऊलीचे नाव आहे. अम्मा म्हणजेच गंगुबाई गजानन जोरगेवार.
चंद्रपूरातील अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांची ती आई. आज जोरगेवार परिवात जे ऐश्वर्य दिसत त्यात कुटुंब प्रमुख असलेल्या अम्माचा मोठा हातखंड आहे. सुरुवातीला घरात अठरा विश्वे दारिद्र्य होते. पोटाची भुक अस्वस्थ करणारी होती. किर्रर्र जंगलात जाणे बांबु तोडून त्यापासुन टोपल्या विकणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. हातावर आणून पानावर खाणे असा दिनक्रम या कुटुंबाचा होता. अशातही अम्मा कधी खचली नाही. कष्ट आणि संघर्षाच्या मार्गावर ती चालत राहली. अशात मोठा मुलगा किशोर जोरगेवार हे 8 वर्षाचे असतांना त्यांच्या पायाला जखम झाली. डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितले या दरम्यान अम्माने मीठ-पोळी चारुन किशोर यांचा नागपुर येथे उपचार केला. मात्र वेळेवर रक्त उपलब्ध होऊ न शकल्याने किशोर यांना कायमचे दिव्यांगत्व आले. मात्र अम्मा खचली नाही. महानगरपालिकेसमोर फुटपाथवर टोपल्या विकण्याचा व्यवसाय तिने सुरूच ठेवला. अशात मुले मोठी होऊ लागली. तिने यशाचा मुलमंत्र म्हणजे कष्ट ही शिकवण मुलांना दिली होती. त्यातुन जोरगेवार परिवार सावरु लागला मुलाला डॉक्टर बनवायचे होते. मात्र परिस्थितीमुळे ते शक्य झाले नाही. मात्र आता अम्माच्या कष्टाने काळानुसार जोरगेवार कुटुंबीयांची परिस्थिती बदलली आहे. मुलाला डॉक्टर बनवता आले नाही पण तिने आपल्या नातीनला वैद्यकीय शिक्षण देत डॉक्टर केले. एक मुलगा म्हणजेच किशोर जोरगेवार हे चंद्रपूरातील आमदार आहे. तर दुसरा मुलगा प्रशांत जोरगेवार चंद्रपूरातील प्रसिध्द व्यावसायिक आहे. आज घरी श्रीमंती नांदत आहे. असे असतांनाही अम्माने कष्टाचा मार्ग सोडलेला नाही. आज सत्तरी ओलांडली असली तरी अम्माने महानगरपालिकेसमोर टोपल्या विकण्याचे काम अविरत सुरु ठेवले आहे. एकेकाळी मुलाला मीठ-पोळी चारुन जगवले याची जाण आजही अम्माला आहे. त्यामुळे किशोर जोरगेवार हे निवडून येताच अम्माने चंद्रपूरात कोणीही उपाशी पोटी झोपू नये यासाठी काम करण्याचे किशोर जोरगेवार यांना सांगीतले होते. अम्माची आज्ञा पाळत त्यांनी चंद्रपूरात अम्मा का टीफिन हा उपक्रम सुरु केला आहे. या उपक्रमाअंतर्गत गरजूंना घरपोच जेवणाचा टिफिन पोहचविला जात आहे. अम्माने दिवसभर टोपल्या विकून मिळविलेल्या पैशातून या उपक्रमाला हातभार लावल्या जात आहे. रस्ताच्या कमतरतेमुळे 9 वर्षाचे असतांना आमदार किशोर जोरगेवार यांचे पायाचे ऑपरेशन यशस्वी होऊ शकले नव्हते. त्यामुळे चंद्रपूरात रक्ताची कमतरता भासू नये या दिशेनेही अम्माच्या सुचनेनतंर चंद्रपूरात काम केल्या जात आहे. अम्माच्या याच खडतड मात्र यशस्वी प्रवासामुळे त्या महाराष्ट्रात प्रकाश झोकात आल्या आहे. याची दखल घेत सकाळ समुहाने मदर हु ईन्सपायर हा या पुरस्कारासाठी अम्माचे नाव नामांकीत केले आहे. अम्माला मिळालेल्या या पुरस्काराबदल आज राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माला व्हिडीओ कॉल करत शुभेच्छा दिल्यात. अम्माचे काम कौतुकास्पद आहे. पुरस्काराचा कार्यक्रम करून घ्या त्यानंतर एक दिवस वर्षा बंगल्यावर या असे आमंत्रनही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अम्माला दिले आहे.