आम आदमी पार्टी बल्लारपूर तर्फे राणीलक्ष्मी वार्ड ची समस्या सोडविण्याचा प्रयत्न
आम आदमी पार्टीचे मीडिया प्रभारी सागर कांबळे व महिला सचिव ज्योती बाबरे यांच्या नेतृत्वाखाली शहर संयोजक रविकुमार पुप्पलवार जी यांच्या प्रमुख उपस्थितीत दिनांक 27/06/2022 रोजी राणीलक्ष्मी वार्डात अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या खुल्या नाल्यातील अस्वच्छ रेल्वे आवारातील पाणी रस्त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत गुडघाभर पाणी साचत असून या समस्येवर मुख्याधिकारी नगरपरिषद बल्लारपूर आणि A. D. E. N मध्य रेल्वे बल्लारपूर यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. रेल्वे भिंतिला लागलेला खुला नालयाचे घाण पाणी नगरपरिषदेच्या नाल्याला मिळते. नगर परिषदेच्या छोट्या ड्रेन पाईपमुळे रेल्वेच्या मोठ्या नाल्यातून वाहणारा कचरा साचतो, अभावी एका चेंबर (गटार) नाल्याचे पाणी रस्त्यावर येते, अनेक घरांच्या अंगणात घाण पाणी साचते, त्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासातून जावे लागत आहे, या परिसरातील नागरिकांना याचा खूप त्रास होत आहे, गेल्या दहा वर्षांपासून या समस्येला येथील रहिवासी तोंड देत आहे, या समस्यांची माहिती आम आदमी पक्षाचा कार्यकर्ता ला मिळताच त्यावर कारवाई करून संबंधित रेल्वे अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आणि समस्या ठिकाणी बोलावून ही समस्या लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
यावेळी शहर संयोजक रविकुमार पुपलवार, सहसंयोजक अफजल अली, महिला उपाध्यक्ष सलमा सिद्दीकी, संघटना मंत्री सरिता गुजर, सचिव ज्योती बाबरे, मीडिया प्रमुख सागर कांबळे, गणेश सिलगमवार, हेमराज गेडाम, आणि राणीलक्ष्मी वार्ड मधील पीडित नागरिक व इतर क्रांतिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.