युवा उद्योजक इंजि. निलेश ज्ञानदेव गायकर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा…
अहमदनगर
संगमनेर/प्रतिनिधी, २८ जून : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हा माजी उपाध्यक्ष व युवा सामाजिक कार्यकर्ते उद्योजक इंजि. निलेश ज्ञानदेव गायकर यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी प्रमाणे “एक हात मदतीचा” या संकल्पने नुसार खांडगाव येथील स्वयंप्रेरित सामाजिक विकास संस्था येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे तसेच दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तू , खाऊ यांचे वाटप करत साजरा करण्यात आला.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
यावेळी विकास संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना निलेश गायकर म्हणाले, मी दर वर्षी माझा वाढदिवस अहमदनगर जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सीताराम पाटील गायकर यांच्या मार्गदर्शना खाली सामाजिक उपक्रमांनी साजरा करत असतो. आपल्या भागातील मुलांना शिक्षणात आपला ही खारीचा वाटा असावा या उद्देशाने मी गेल्या आठ ते नऊ वर्षा पासून मुलांना शैक्षणिक साहित्य तसेच दैनंदिन लागणारे साहित्य यांचे वाटप करत असून वाढदिवशी होणाऱ्या वायफळ खर्चाचा मी यासाठी उपयोग करत असतो.
निलेश गायकर त्यांचा वाढदिवस दरवर्षी सामाजिक बांधिलकी जपत विविध सामाजिक उपक्रम घेत करत असतात त्यांच्या या उपक्रमाचे नेहमीच विविध स्तरातून कौतुक केले जाते.
याप्रसंगी गांगासृष्ठीचे संचालक शिरीष गुंजाळ, दूरसंचार अधिकारी ज्ञानदेव गायकर, प्रीतम कडलग, संतोष पवार तसेच संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.