आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश…

0
714

आम आदमी पार्टी च्या प्रयत्नांना यश…

◆ झोलाछाप डॉक्टरांवर कारवाही

◆ लोकप्रतिनिधींच्या निश्काळजीपणामुळे लोकांचे आयुष्य धोक्यात

◆ प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांच्या पत्राची दखल घेवून कारवाही

 

चिमूर विधानसभेत ग्रामीण भागातील जनतेच्या अज्ञानाचा फायदा घेत बोगस डिग्री असलेले अनेक डॉक्टर गावोगावी उपचार करत आहेत. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे. झोलाछाप डॉक्टरांच्या अर्धवट ज्ञानामुळे अनेक जन दगावले परंतु त्याची नोंद घेतल्या गेली नाही. कोरोना काळात कोणतीही डिग्री नसतांना अनेकांनी आपले वैधकिय दुकान थाटले. याची दखल आम आदमी पार्टी तर्फे घेण्यात आली आणि तसा आवाजही उठविला गेला. प्रशासनाला याची माहिती असूनही मुद्दाम दुर्लक्ष केले जात होते. लोकप्रतिनिधी या मुद्द्यावर पूर्ण उदासीन असून त्यांच्या या निश्काळजीपणामुळे हजारो लोकांचे आयुष्य धोक्यात होते.

 

आम आदमी पार्टी चे चिमूर विधानसभा संयोजक प्रा. डॉ. अजय घनश्यामजी पिसे यांनी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तसेच चिमूर चे उपविभागीय अधिकारी, तहसीलदार नागभीड यांना ई-मेल द्वारे झोलाछाप डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असून लोकांच्या आरोग्याला गंभीर धोका आहे असे कळविले होते. वातावरणातील हंगामी बदलामुळे चिमूर व नागभीड तालुक्यातील सर्वच भागामध्ये आरोग्याच्या समस्या भेडसावत आहेत. बहुतांशी भाग हा ग्रामीण असल्यामुळे व जनतेमध्ये आरोग्याबद्दल पाहिजे तितकी जागरूकता नसल्यामुळे गावोगावी बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट माजलेला आहे. कोणतीही वैध पदवी नसतांना अनेक बोगस डॉक्टर लोकांना औषधे, इंजेक्शन, सलाईन देतांना आढळतात. प्रशासन यावर स्वस्थ बसले असून कोणतीही कारवाही केली जात नाही. यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य धोक्यात आले असून यावर प्रशासनच पूर्णपणे जबाबदार राहील अशी तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीची दखल घेवून प्रशाशनाने तात्काळ कारवाही चालू केली असून काही झोलाछाप डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. आम आदमी पार्टी च्या या प्रयत्नांचे जनमानसात कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here