अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपिला अटक

0
2116

अल्पवयीन मुलीचा विनयभंग आरोपिला अटक

पोंभुर्णा तालुक्यातील धक्कादायक घटना

पोंभुर्णा प्रतिनिधी:- २२ वर्षीय युवकाने गावातच राहणार्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील पोंभुर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली.
याप्रकरणी पोंभुर्णा पोलिसांनी पोस्को कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे. दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसुन येत आहे.महिला तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत.अशातच तालुक्यातील पोंभुर्णा ठाण्याच्या हद्दीतील नवेगाव मोरे येथील एका अल्पवयीन मुलीची तिच्या घरात घुसून विनयभंग केल्याचा प्रकार काल उघडकीस आला.
प्राप्त माहितीनुसार अल्पवयीन मुलगी आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातील धनराज पुरोषोत्तम पाल वय २२ वर्षे हा तिच्या घरात घुसून तिचा विनयभंग केला हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी धनराज पुरोषोत्तम पाल वय 22 याच्यावर पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली.त्याचेवर भांदवी कलम 354,354(ड)452,506 सहकलम 8,12 लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपीला अटक करुन न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पुढिल तपास अपविभागिय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि. राजश्री रामटेके व सपोनि धर्मेंद्र जोशी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here