परवाना केवळ एक हजार ब्रासचा वापर अंदाजे पाच हजार ब्रासचा
ए.जी कंट्रक्शन कंपनीचे काम ; मुरूम प्रकरण
तात्काळ पंचनामा करून कार्यवाही करण्याची शिवसेनेची मागणी
गोंडपिपरी : गोंडपिपरी तालुक्यातील नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे काम करणाऱ्या ए. जी कंट्रक्शन कंपनीने आतापर्यंत अंदाजे ५००० ब्रास मुरमाचा वापर केला असून शासनाचा लाखोंचा महसूल बळवला असल्याचा आरोप करत चौकशी करून कार्यवाही करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी केली आहे.
नवेगाव वाघाडे ते आष्टी मार्गाचे काम करणाऱ्या ए. जी कंट्रक्शन कंपनीला केवळ 1000 ब्रास मुरूम वापरण्यासाठी परवाना मिळाला असल्याची माहिती (माहिती अधिकारातून) मिळाली.परंतु त्या मार्गावर दुतर्फा रस्त्यावर रस्ता मजबुती करणासाठी वापरलेला मुरूम हा अंदाचे 5000 ब्रास असावा असा अंदाज असल्याने पंचनामा करून चौकशी करावी दोषी आढळल्यास कार्यवाही करावी सोबतच ज्या ठिकाणावर उत्खनन करण्याची परवानगी होती त्या ठिकाणावर देखील मोजमाप करावे अशी मागणी आज दि.23 गुरुवारी शिवसेना तालुका प्रमुख सुरज माडुरवार यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.
दिवस रात्र सदर कामावर मुरमाचा मोठा वापर करण्यात येत होता त्यामुळे कार्यवाही कडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.