योगेश आपटे यांची ओबीसी जनगणना समन्वय समितीच्या चंद्रपूर महानगर पदी नियुक्ती
चंद्रपूर शहरातील धडाडीचे कार्यकर्ते आणि विविध सामाजिक चळवळी मध्ये हिरीरीने भाग घेऊन शिवराय, फुले शाहू, आंबेडकर व पेरियार ई महापुरुषांचा स्वाभिमानी विचार तरुणां पर्यंत पोहोचविण्याचा सातत्याने प्रयत्न करणारे युवा कार्यकर्ते श्री योगेश आपटे यांची ओबीसी जनगणना समन्वय समिती चंद्रपूर महानगर चे अध्यक्षपदी समितीचे मुख्य संयोजक बळीराज धोटे यांनी नियुक्ती केली आहे.
श्री योगेश आपटे यांना सामाजिक कार्याची मुळातच आवड आहे. त्यांनी आम आदमी पार्टी मधेही काम केले आहे. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून ते बहुजनवादी विचाराने प्रेरित आहे. चंद्रपूर येथे संविधान दिनी दि 26 नोव्हे 2020 ला निघालेल्या ओबीसीच्या विशाल मोर्चा मध्ये त्यांनी सहकारी व कार्यकर्त्या सह सक्रिय सहभाग घेतला. ते नेहरू नगर सारख्या मागास वस्तीत वास्तव्याला असतात. पण बँकेचे दैनिक संकलन कर्ता एजेंट म्हणून ते चंद्रपूर शहरातील सामान्य लोकांच्या नियमित संपर्कात असतात.
योगेश आपटे यांच्या नियुक्तीने चंद्रपूर शहरांत ओबीसी जनगणना समन्वय समितीचे संघटन अधिक मजबूत होईल असा विस्वास मुख्य संघटक बळीराज धोटे यांनी त्यांची महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करतांना व्यक्त केला आहे. योगेश आपटे यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा.
बळीराज धोटे
मुख्य संयोजक
ओबीसी जनगणना समन्वय समिती
7410545511, 8855872562