योग ही निसर्गाने पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी

0
634

योग ही निसर्गाने पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी

योग भवणाच्या निर्मितीसाठी एक करोड रुपये देणार – आ. किशोर जोरगेवार

आंतराष्ट्रीय योग दिना निमित्त विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन

 

 

 

धावपळीच्या जिवनात मनुष्य आरोग्याकडे दुर्लक्ष करु लागला आहे. मात्र कोरोना संकटाने आपल्या निरोगी शरीराशिवाय कोणतीच संपत्ती मोठी नसल्याची शिकवण दिली आहे. योगामुळे आपले शरीर, मनाला अध्यात्म आणि सामाजिक दृष्ट्या तंदुरुस्ती लाभते. योग ही निसर्गाने मनुष्याला पुरातन काळापासुन दिलेली मौल्यवान देणगी असुन शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी व्हायचे असेल तर दररोज न चुकता किमान एक तास योगा करण्याची गरज त्यामुळे आपण योग प्रकाराला प्रोत्साहन मिळावे योग करण्यासाठी स्वंतत्र व्यासपीठ असावे या करिता योग भवन निर्मितीसाठी साठी एक करोड रुपये देणार असल्याची घोषणा आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

 

आज मंगळवारी जागतिक योग दिनानिमित्त योग नृत्य परिवार ट्रस्ट यांच्या वतीने तर यंग चांदा ब्रिगेड यांच्या संयोजनाने पोलिस मैदान येथे विश्व योग नृत्य महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी ते बोलत होते. या महोत्सवाला रामनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेश मुळे, डॉ. गोपाल मुंदडा, आकाश घोडमारे, आशिष झा, ऐकाडे, सुरेश घोडके, प्रशांत कत्तुलवार, शशिकांत मस्के, जितेंद्र ईजगोरवार, यांच्यासह यंग चांदा ब्रिगेडचे जिल्हा महानगर अध्यक्ष पंकज गुप्ता, महिला शहर संघटिका वंदना हातगावकर, प्रा. श्याम हेडाऊ, विश्वजित शाहा, अमोल शेंडे, राम जंगम, विलास वनकर, विलास सोमलवार युवती प्रमुख भाग्यश्री हांडे आदिंची उपस्थिती होती.

 

यावेळी पुढे बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूर हा प्रदूषित जिल्हा आहे. अशा प्रदूषित आणि उष्ण जिल्ह्यात निरोगी राहण्यासाठी योग आणि योग नृत्य नित्य करणे गरजेचे आहे. शरिराराला ऊर्जा देण्यासाठी व्यस्त जिवणात थोळा वेळ काढून योग करत शरिर स्वस्थ ठेवले पाहिजे. आयोजकांनी योगाचा योग नृत्य हा नविन प्रकार चंद्रपूरात सुरु केल्या बदल यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी आयोजकांचेही आभार मानले.

 

योगा हा व्यक्तीला शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक पातळीसारख्या सर्व आयामांवर नियंत्रण ठेवून उच्च पातळीची संवेदनशीलता प्रदान करते. विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी तसेच अभ्यासावर त्यांची एकाग्रता वाढवण्यासाठी योगाच्या रोजच्या सरावाला शाळा आणि महाविद्यालयानेही प्रोत्साहन दिले पाहिजे. रोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपण आपली जीवनशैली संपूर्ण बदल केला आहे मात्र कोरोनामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष द्यायला लागलो. निरोगी आरोग्य हीच खरी संपत्ती हे आपल्याला कळले आहे. भारतातील ही योग संस्कृती जागतिक पातळीवर बहुतांश देशांनी स्विकारली असून, योगासनांचे लाभ त्यांनीही मोठ्या प्रमाणावर अनुभवले आहेत. जगभरातील देशांनी केवळ योग स्विकारली नाही, तर त्याचा प्रचार आणि प्रसारही केला. आताच्या घडीला संपूर्ण जगावर कोरोनाचे सावट असताना योग दिनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चंद्रपूरातही योगाचे महत्व नागरिकांना पटावे त्यांना योग साधना करण्याकरिता स्वताचे भवन असावे या भवनातून योगाचा प्रसार प्रचार व्हावा या करिता चंद्रपूरात योग भवनाची निमिती व्हावी या करिता माझे प्रयत्न असणार असुन या भवनासाठी एक करोड रुपये देणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. या योग नृत्य महोत्सवात योग साधकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here