सातरी येथे सिमेंट रस्त्यासाठी 5 लाखाचा निधी
माजी सभापती सुनिल उरकुडे यांच्या हस्ते भूमिपूजन
राजुरा : मागील पाच वर्षांपासून आपल्या क्षेत्रातील विकासासाठी सतत प्रयत्नशील असणारे सुनील उरकुडे जिल्हा परिषदेचे सभापती बनल्यानंतर सतत राजुरा तालुक्यातील गावाच्या विकासासाठी पाठपुरावा करीत कामे करण्याचा सपाटाच सुरू केला. जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर मजूर झालेल्या कामांचे भूमिपूजन सुरू असून राजुरा तालुक्यातील सातरी येथे नुउकतेच जिल्हा परिषदेचे सभापती सुनील उरकुडे यांच्या हस्ते पाच लाख रुपये जिल्हानिधी अंतर्गत सिमेंट रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन केले आहे.
ग्रामीण भागात मूलभूत सुविधा पूर्ण करण्याच्या दृष्टीने
शक्य त्या पद्धतीने विकास कामे करण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून सुरू आहे. अपल्या कार्यकाळात मंजूर विकासकामांची लवकरात लवकर पूर्तता होईल तालुक्यात कुठल्याही गावाला मूलभूत विकासापासून वंचित राहू देणार नसल्याचे मत सुनील उरकुडे यांनी यावेळी व्यक्त केले.
याप्रसंगी सातरी येथील सरपंच पद्माताई वाघमारे, उप सरपंच भाऊराव बोबडे, ग्रामसेवक पारखी मॅडम, प्रकाश बोढे, निशांत मून, वर्षाताई सातपुते, प्रांजु हेपट, बबीताताई टेकाम, पोलीस पाटील विजय पारशीवे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अशोक चकोर, माजी सरपंच मंगेश मोरे, शंकर धुर्वे, मारोती कार्लेकर, अरुण कार्लेकर, बादल वाघमारे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.