21 जून आंतरराष्ट्रीय योगदिनाचे भव्य आयोजन
“माझा गाव कोठारी” मिशन अंतर्गत उपक्रम
कोठारी :- राज जुनघरे
संयुक्त राष्ट्र संघाने 21 जून हा आंतरराष्ट्रीय योगदिन म्हणून जाहीर केलेला असून केंद्र सरकारने सुध्दा या दिवसाचे महत्त्व जाणून निरोगी आरोग्य पुर्ण जिवन शैली आत्मसात करून संपूर्ण भारतीयांचे आरोग्य सुदृढ व्हावे या उद्दात हेतुने संपूर्ण भारतात योग दिवस साजरा करण्याचे ठरविले आहे. योग दिनाचे औचित्य साधून स्थानिक युवकांनी प्रथमताच पुढाकार घेऊन ” माझा गाव कोठारी ” या मिशन अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्था, साद मानुस्की फाऊंडेशन, भिम आर्मी (भारत एकता मिशन), सन्मित्र बहुउद्देशीय संस्था, रॉयल बहुउद्देशीय संस्था, छायाचित्रकार बहुउद्देशीय संस्था, पोलिस विभाग, कोठारी पत्रकार संघ, वनविभाग, आरोग्य विभाग, सामाजिक संघटना, विविध संस्था, महिला बचत गट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका व युवकांच्या सहकार्याने एकत्रित बैठक घेऊन 21 जून रोज मंगळवार ला सकाळी 5.30 ते 7.00 वाजेपर्यंत जनता विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे योग दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या योगदिना निमित्ताने प्रशिक्षक म्हणून गोंडवाना विद्यापीठाच्या वेट लिप्टिंग सुवरणपदकाच्या मानकरी, चंदिगड ” पंजाब” युनिव्हर्सिटी पॉवर लिप्टिंग पदक विजेत्या व योग अभ्यासक व मेडिटेशन बिपिएड कॉलेज विसापूर येथुन प्रशिक्षित प्रशिक्षिका रुपाली दुर्योधन ह्या योग अभ्यास घेणार आहेत. या आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून ” माझा गाव कोठारी ” नियोजित उपक्रमास मोठ्या संख्येने सहभागी होवून निरोगी आरोग्यासाठी होण्याचे आवाहन ” माझा गाव कोठारी ” मिशनचे अध्यक्ष नितीन रायपुरे, अनिल विरुटकर, वासुदेव खाडे, सचिन रायपुरे, राज जुनघरे, विवेक रामटेके, संतोष लोनगाडगे, गिरीश लोहे, अभय बुटले, पियुष लोडलिवार, प्रमोद कातकर, संदिप मावलीकर, यांनी केले आहे.