अखेर नेरी प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाले तज्ञ डॉक्टर
जि. प. सदस्य मनोज मामीडवार यांच्या प्रयत्नाला आले यश
प्रतिनिधी विकास खोब्रागडे
नेरी हे मोठे गाव असून 15 हजारच्या वर लोकसंख्या असलेले गाव असून या गावसभोवताल परिसरातील अनेक गाव नेरीवर आरोग्याच्या दृष्टीकोनातून अवलंबून असतात इथे एक प्राथमिक आरोग्य केंद्र असून मागील बरेच दिवसापासून तज्ञ डाँकटर ची कमतरता होती बरेचदा आरोग्य विभागाला मागणी अर्ज विनंत्या करूनही डाँकटर मिळाले नाही तेव्हा मनोजभाऊ मामीडवार यांनी प्रशासना कडे तज्ञ डाँकटर ची मागणी रेटून धरली अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश मिळाले असून नुकतेच डाँकटर निखिल मनोज कामडी यांची नियुक्ती नेरी प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आली आणि त्यांनी पदभार स्वीकारले असून कामाला सुरुवात केली आहे.
नेरी आरोग्य केंद्रात मागील अनेक दिवसांपासून तज्ञ डाँकटर नसल्यामुळे या परिसरातील नागरिक ,रुग्ण हे खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जात होते आरोग्य केंद्रात डाँकटर व कर्मचारी यांची कमतरता असल्यामुळे बाकी कर्मचार्यांचा कामाचा ताण वाढला होता आणि सध्या कोरोना चा कहर सुरू असल्यामुळे रुग्णाची सोय करण्यासाठी डाँकटर नसल्याने खूप मोठी कसरत होत होती कारण या आरोग्य केंद्रात फक्त एकच डाँकटर शिल्लक असल्यामुळे सर्व जवाबदारी त्यांच्यावर आली होती तेव्हा मामीडवार यांनी जोरदार मागणी करीत प्रयन्त केले आणि त्यांना यश प्राप्त झाले डाँकटर कामडी हे नेरी येथील रहिवासी असून त्यांनी सुद्धा या नेरी आरोग्य केंद्रात आपली नियुक्ती करून घेतली त्यामुळे अनेक रुग्णांनी आरोग्य केंद्राकडे पाठ फिरविली होती ते आता तज्ञ डाँकटर येताच परत आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी गर्दी करीत आहेत त्यांच्या नियुक्ती झाल्यावर पदभार स्वीकारताना आरोग्य केंद्रात पुष्पगुच्छ देऊन मनोज मामीडवार जी प स डाँकटर आर कोवाचे आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी स्वागत केले.