घुग्घुसच्या आगामी निवडणुकीत अनु. जाती/अनु. जमातीच्या आरक्षणाला संरक्षण द्या…!
राजकीय दबावातून अनु. जाती/अनु. जमातीच्या आरक्षणावर आक्षेप- आपचे शहर अध्यक्ष अमित बोरकर
दि.१७ जुन २०२२ शुक्रवार रोजी घुग्घुस नगर परिषद येथे आम आदमी पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.
13 जूनला घुग्घुस नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या राजकीय आरक्षणाची सोडत सर्व राजकीय पक्षाच्या समोर निष्पक्ष व पारदर्शकरित्या योग्य पद्धतीने पार पडली. परंतु काही राजकीय पक्षाकडून राजकीय दबाव निर्माण करून अनु. जाती/अनु. जमातीच्या राजकीय आरक्षणावर आक्षेप घेतला जात आहे.
तरी 13 जून रोजी काढण्यात आलेले राजकीय आरक्षण जसेच्या तसेच ठेवण्यात यावे अशी मागणी आपचे घुग्घुस शहर अध्यक्ष अमित बोरकर यांनी घुग्घुस नपचे मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केला आहे.