छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा चा उत्कृष्ट निकाल!
आज दिनांक 17/06/2022 ला ऑनलाइन घोषित केलेल्या एस.एस.सी. (वर्ग 10,वी) परीक्षेच्या निकालांमध्ये भद्रावती तालुक्यातील ग्रामीण क्षेत्रांमध्ये आय.एस.ओ.(ISO) नामांकित असलेल्या छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा या शाळेचा एस एस सी परीक्षेचा निकाल 100.टक्के लागला असून एकूण 36, विद्यार्थ्यांपैकी 36, विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. यामध्ये प्राविण्य श्रेणी मध्ये 25, विद्यार्थी आणि प्रथम श्रेणीमध्ये 11, विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांमधून सर्वप्रथम कु,गायत्री गोंडे, (87.80,टक्के) द्वितीय कु, मानसी उपरे, (86.80 टक्के) तृतीय कु, मयुरी पिदुरकर (86.00,टक्के) व कु,पल्लवी शिंदे (86.00 टक्के) आणि चतुर्थ कु,भुवनेश्वरी ढेंगडे (85.40 टक्के) व कु, चित्रा लेडांगे (85.40 टक्के) उर्वरित 19, विद्यार्थ्यांना 80, टक्के चे वर गुण प्राप्त झालेले आहेत.
छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय कोंढा ही शाळा भद्रावती तालुक्यात ग्रामीण क्षेत्रांमध्ये गेल्या 32 वर्षांपासून विद्यादानाचे पवित्र कार्य करत असून सदर विद्यालय हे ग्रामीण क्षेत्रांमध्ये आय.एस.ओ. (ISO) नामांकित विद्यालय आहे. या विद्यालयांमध्ये सर्व आवश्यक भौतिक व शैक्षणिक सुविधा उपलब्ध आहेत. मागील शैक्षणिकसत्रामध्ये, विद्यालय 17, जुलै 2021 पासून नियमित सुरू होते कोरोनाच्या काळामध्ये पालकांच्या संमतीने व covid-19 च्या नियमांचे पालन करून वर्ग 10वी, च्या विद्यार्थ्यांचे नियमीत व दररोज जादा वर्ग घेऊन तसेच प्रत्येक विषयांच्या स्वतंत्र चाचणी परीक्षा घेऊन विद्यार्थांची बोर्डाच्या परिक्षेबद्दलची भिती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास मार्गदर्शनातून निर्माण करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या एकूण तीन सराव परीक्षा घेऊन त्यांचे निकाल पालकांपर्यंत दाखवण्यात आले.
एकंदरीत विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासाप्रति रुची, आवड निर्माण करण्यात आली. तसेच शाळेबद्दल प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेम व आकर्षण असल्यामुळे कोणताही विद्यार्थी गैरहजर नसायचा. विद्यार्थ्यांचे अथक प्रयत्न, शिक्षकांचे अचूक मार्गदर्शन, पालकांचे वेळोवेळीचे सहकार्य, आणि मुख्याध्यापकांचे शिस्तबद्ध व कुशल प्रशासन या सर्व घटकांच्या सहाय्यानेच शाळेचा गुणवत्ताधारक उत्कृष्ट 100 टक्के निकाल लागलेला आहे.अशी प्रतिक्रिया शाळेचे संस्थापक -सचिव प्राचार्य पायपरे सर, यांनी व्यक्त केले आणि सर्व विद्यार्थ्यांचे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकाचे अभिनंदन करून भविष्यामध्ये शाळेच्या निकालाची अशीच परंपरा कायम ठेवावी व सर्व विद्यार्थ्यांनी पुढील शिक्षणामध्ये दैदिप्यमान यश संपादन करावेत अश्या शुभेच्छा शाळेचे संस्थापक-सचिव पायपरे सर यांनी व्यक्त केल्या.