श्रीवास्तव कन्स्ट्रक्शनकडून भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ

0
844

श्रीवास्तव कन्स्ट्रक्शनकडून भरपाईची रक्कम देण्यास टाळाटाळ

कोर्टाच्या आदेशाची अवहेलना

 

 

कोरपना – नांदाफाटा येथे श्रीवास्तव यांच्या यशोधन विहार प्रकल्पातून प्रधानमंत्री आवास योजना व म्हाडा अंतर्गत सर्वांसाठी घरे असा करोडो रुपयांच्या खाजगी वसाहतीचे काम सुरु आहे. तर दुसरीकडे श्रीवास्तव कन्स्ट्रक्शनकडून कामागारांच्या अपघाती मृत्युनंतर साडेपाच लाखांची भरपाई कामगाराच्या कुटुंबीयांना देण्यात येत नसल्याचे प्रकरण समोर आले आहे.

 

सविस्तर वृत्त असे की, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीत श्रीवास्तव कन्स्ट्रक्शन या कंत्राटदाराकडे मृतक हरीश सिंग राठोड ठेकेदारीत कामावर होता. ६ मे २०११ ला सायकलने कामावर जात असताना हरीश सिंग राठोड यांचा ट्रकने अपघात होऊन जागीच मृत्यु झाला होता. ठेकेदारी कामागारांचा कंत्राटदार कंपनीकडून विमा काढला जातो. अपघातात मृत्युमुखी पडल्याने विमा कंपनीकडून विम्याची रक्कम मृतकाच्या परिवाराला अदा केली जाते. मात्र मृत्युनंतर विम्याची रक्कम मिळाली नाही. याविरोधात मृतकाची पत्नी मंजू राठोड हिने २२ जानेवारी २०१३ रोजी श्रीवास्तव कन्स्ट्रक्शन कंपनीकडून भरपाईची रक्कम मिळण्याकरीता चंद्रपूर न्यायालयात दाद मागितली होती. ५ जुलै २०१४ रोजी न्यायालयाने मंजूकवर राठोड व तिचे परिवाराला ५ लक्ष ५३ लाख ९७२ रुपये भरपाई देण्याचा आदेश पारीत केला. चंद्रपूर कोर्टाचा निर्णय मान्य नसल्याने या आदेशाविरोधात श्रीवास्तव कन्स्ट्रक्शनकडून उच्च न्यायालयात प्रकरण दाखल केले गेले. उच्च न्यायालयाचाही निकाल मंजुकवर राठोड हिचेच बाजुने लागला. चंद्रपूर न्यायालयाच्या आदेशानंतरही श्रीवास्तव कस्ट्रक्शनकडून मृतक परिवाराच्या कुटूंबाला ५ लक्ष ५३ हजार ९७२ रुपये भरपाईची रक्कम देण्यात आली नाही. मृतक परिवाराच्या कुटूंबाला भरपाईची रक्कम श्रीवास्तव कन्स्ट्रक्शनकडून जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी वसुल करुन देण्याबाबत न्यायालयाच्या आदेशात नमुद आहे. मात्र ८ वर्ष उलटूनही मदत मिळत नसल्याने मृतकाची पत्नी व त्याचे परीवाराला शासकिय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. जिल्हाधिकार्‍यांनी श्रीवास्तव कन्स्ट्रक्शनकडून भरपाईची रक्कम मृतकाच्या परिवाराला मिळवून देण्याची मागणी करण्यात आली असून लोकप्रतिनिधिनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

 

श्रीवास्तव यांचेकडून नांदाफाटा येथे यशोधन विहार या नावाने खाजगी वसाहत उभी केली जात आहे. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत सर्वांसाठी घरे लाखो रुपये अनुदान सोबतच ९० टक्के बँक लोन असा करोडो रुपयाचा मोठा प्रोजेक्ट सुरु आहे. तर दुसरीकडे माझ्या परीवाराचे भरपाईची रक्कम ५ लाख ५३ हजार ९७२ रुपये वारंवार मागणी करुनही दिली जात नाही. तुम्हाला २ ते २.५० लाख देतो असे सांगितले जाते. भरपाईची रक्कम व त्यावरील व्याज असे १० लाखाचे वर रक्कम घेणे आहे. भरपाईची रक्कम न दिल्यास लवकरच उपोषण करणार आहे.”

– मंजुकवर राठोड, नांदाफाटा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here