MJP च्या विरोधात आम आदमी पार्टी बल्लारपूर चे “जल त्याग आंदोलन”

0
732

MJP च्या विरोधात आम आदमी पार्टी बल्लारपूर चे “जल त्याग आंदोलन”

 

MJP चे अधिकारी, कर्मचारी व पाण्याच्या समस्येने त्रस्त जनतेसोबत 17 जून 2022 ला एक दिवसीय जलत्याग धरणा आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात शहराध्यक्ष रविकुमार पुप्पलवार, शहर उपाध्यक्ष अफजल अली, महिला शहर उपाध्यक्षा सलमा सिद्दीकी यांनी जलत्याग करून धरणा देणार आहेत.

आप बल्लारपूर जनतेला आवाहन करते की, आपल्या हक्काची लढाई आता आपल्यालाच लढायची आहे, हे परंपरागत राजकारणी आणि त्यांचे पक्ष फक्त “पैसा नि सत्ता” आणि “सत्तेतून पैसा” कमावण्याचा धंदा करत आहेत, त्यांच्या स्वार्थासाठी आमचा मतदानाचा हक्क “खरेदी आणि विक्री” करत आहेत. सर्वसामान्यांना सहानुभूती/आश्वासन देऊन आमची पिळवणूक करत आहेत. सध्याचे राजकीय पक्ष आम्हाला मुलभूत सुविधा देऊ शकत नाहीत. सत्तेसाठी धर्म, जात, भाषेच्या नावाखाली आमच्यात फूट पाडून त्यांचा धंदा चालवत आहेत. आता आपल्याला संघटीत होऊन, परिवर्तन घडवून आणण्याची सद्याची गरज आहे. सर्व जनतेनी या आंदोलनात सहभागी घ्यावे असे आवाहन आप बल्लारपुर द्वारे करण्यात आले आहे.

खालील मांगण्या करीता आंदोलन करण्यात येणार आहे.
१) पिण्याचे शुद्ध पाणी द्यावे.
२) जुनी पाण्याची बिले माफ करावी , शहरातील प्रत्येक कुटुंबाला नळ कनेक्शन द्यावे.
३) मनमानी नळ बिले पाठवणे थांबवा.
४) घरचे आणि सार्वजनिक नळ ठराविक वेळेत सोडण्यात यावे.
५) शहरात अनेक जुनी पाइप लाइन गळती आहेत, ती त्वरित दुरुस्ती करावी.
६) 24×7 पाणी योजना सुरू करावी व नंतर मीटर रीडिंग प्रमाणे बिल घ्यावे. नाहीतर सरासरी बिल द्यावे.
७) बल्लारपूर शहरातील नवीन पाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम सदोष आहे, ते त्वरित दुरुस्त करावे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here