‘नगरपरिषद राजुरा‘ ची आरक्षण सोडत जाहीर…
राजुरा, 13 जून : येत्या काही दिवसात नगरपरिषद राजुराची निवडणूक पार पडणार आहे. याकरिता उमेदवारीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज जाहीर करण्यात आली.
या आरक्षण सोडतीच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदूरकर उपस्थित होते. यावेळी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नगरपरिषदेच्या 10 प्रभागातील 21 जागांसाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज नगरपरिषद येथे पार पडला. यात प्रभाग क्रमांक 1 – ‘अ‘ करिता सर्वसाधारण महिला व ‘ब‘ करिता सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 2 – ‘अ‘ करिता अनुसूचित जाती महिला व ‘ब‘ करिता सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 3 – ‘अ‘ अनुसूचित जाती सर्वसाधारण, ‘ब‘ करिता सर्वसाधारण महिला तर ‘क‘ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 4 – ‘अ‘ करिता सर्वसाधारण महिला व ‘ब‘ करिता सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 5 – ‘अ‘ अनुसूचित जमाती सर्वसाधारण व ‘ब‘ करिता सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 6 – ‘अ‘ मध्ये सर्वसाधारण महिला व ‘ब‘ मध्ये सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 7 – ‘अ‘ अनुसूचित जमाती महिला व ‘ब‘ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 8 – ‘अ‘ सर्वसाधारण महिला व ‘ब‘ सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 9 – ‘अ‘ करिता सर्वसाधारण महिला व ‘ब‘ करिता सर्वसाधारण तर प्रभाग क्रमांक 10 – ‘अ‘ करिता अनुसूचित जाती महिला व ‘ब‘ करिता सर्वसाधारण अशाप्रकारे संवर्ग निहाय आरक्षण सोडत जाहीर करण्यात आले.
आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांत आता चुरस निर्माण झाली असून निवडणुकीची पायबंधणीला वेग आल्याचे चित्र निर्माण झाले आहे.